महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवृत्ती महाराज वक्ते यांच्यावर अ‌ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल - ठाणे बातमी

निवृत्ती महाराज यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हायरल व्हिडिओ कल्याणात राहणारे आशिष इंगळे यांनी फेसबूकवर पाहिला. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर आक्षेपार्ह विधान केल्याचे आढळून आले.

atrocity-file-against-nivrutti-maharaj-vakte-in-thane
निवृत्ती महाराज वक्ते

By

Published : Feb 10, 2020, 9:55 PM IST

ठाणे- निवृत्ती महाराज वक्ते यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केले आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात अ‌ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याने वारकरी सांप्रदयात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा-राष्ट्रवादीच्या 'त्या' नेत्याच्या हत्येसाठी दिली होती ४० लाखांची सुपारी, चौघे ताब्यात


निवृत्ती महाराज यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हायरल व्हिडिओ कल्याणात राहणारे आशिष इंगळे यांनी फेसबूकवर पाहिला. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर आक्षेपार्ह विधान केल्याचे आढळून आले. याप्रकरणी त्यांनी निवृत्ती महाराज यांच्या विरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचारास प्रतिबंध कायद्यानुसार तक्रार दाखल केली. तक्रारदार आशिष इंगळे हे मुंबई उच्च न्यायालय अधिवक्ता आहेत.

काही दिवसापूर्वीच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे देव, धर्म मानत नाहीत. त्यामुळे त्यांना धार्मिक कार्यक्रमांना व्याख्यानाला कशासाठी बोलवता? फक्त पैसा आणि प्रसिद्धीसाठी अशा लोकांना कार्यक्रमांना बोलवू नका,' असे आवाहन निवृत्ती महाराज वक्ते यांनी एका पत्रकाद्वारे करुन शरद पवारांवर बहिष्कार टाकला होता. त्यावेळीही बराच वाद झाला होता. वक्ते महाराज मूळचे जळगाव जिल्ह्याचे रहिवाशी असून ते राष्ट्रीय वारकरी परिषदेचे संस्थापक आहेत.

दरम्यान, आजच सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती-जमातींवर अत्याचारास प्रतिबंध करणाऱ्या अ‌ॅट्रॉसिटी कायद्यात करण्यात येणारी दुरुस्ती ही घटनाबाह्य नसल्याचा निर्णय दिला. त्यामुळे अ‌ॅट्रॉसिटी प्रकरणात कोणत्याही चौकशीशिवाय गुन्हा दाखल करता येणार असल्याचा निर्णय दिल्याने निवृत्ती महाराजाच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details