ठाणे - चांद्रयान-२चे उड्डाण आज दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी झाले. या चांद्रयान-2 मधील बघ ही भारतीय बनावटीची आहे. कमीत कमी मी खर्चामध्ये हे यान पाठवण्यात येत आहे. या मोहिमेचा उद्देश चंद्रावरच्या पाण्याचे संशोधन करणे. तसेच चांद्रभूमीवर असणारी खनिजे शोधून काढणे, चंद्राचा नकाशा तयार करणे, चंद्र आणि पृथ्वी यांचे अंतर मोजणे. तसेच दक्षिण प्रदेशातील वैशिष्ट्य शोधून काढणे या मोहिमेचा भारताला फायदा होणार असून ही अभिमानाची बाब असल्याची माहिती खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी दिली.
चांद्रयान-२ मोहिम ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब - खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण
चांद्रयान-२चे उड्डाण आज दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी झाले. या चांद्रयान-2 मधील बघ ही भारतीय बनावटीची आहे. कमीत कमी मी खर्चामध्ये हे यान पाठवण्यात येत आहे. या मोहिमेचा भारताला फायदा होणार असून ही अभिमानाची बाब असल्याची माहिती खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी दिली.
चांद्रयान मोहिमेचा पहिला फायदा म्हणजे खनिजे. त्यामुळे इंधन समस्या सोडवण्यास उपयोगी होतील का? या मोहिमेमुळे भारतीय कारखानदारीला मोठा फायदा होणार आहे. तसेच संशोधन वृत्तीही वाढत असून, ही अभिमानाची गोष्ट आहे. ही योजना यशस्वी झाल्यानंतर भारत हा जगातील चौथा देश असल्याचे सोमण म्हणाले.
पृथ्वीच्या कक्षेतून जेव्हा चांद्रयान बाहेर पडेल. त्यानंतर ते यान चंद्राच्या कक्षेत जाईल. जेव्हा लँडर चंद्रावर उतरेल ती १० मिनिटे खूप महत्त्वाची आहेत. तसेच रोवर यावेळी बाहेर पडेल आणि संशोधन कार्य करेल तेही महत्त्वाचे आहे. 15 जुलैला जसे अडथळे आले तसे अडथळे कधीही येऊ शकतात. कारण ही मोहीम आव्हानात्मक आहे, म्हणून भारतीय शास्त्रज्ञ प्रत्येक गोष्टीत काळजी घेत आहेत. ही मोहिम यशस्वी होण्यासाठी आपण भारतीय शास्त्रज्ञांना शुभेच्छा देऊया. भारताचा अभिमानाने गौरव करूया असेही सोमण म्हणाले.