ठाणे - युवासेना अधिकारी सुमित सुभाष भोईर यांनी वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत तीन हजार गरजू कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन नवा आदर्श निर्माण केला आहे. सध्या देशभरात लाॅकडाऊन असल्याने रोजंदारीवर काम करणाऱ्या अनेक कुटुंबांना बेरोजगारीमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्तुत्य उपक्रम.. वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत ३ हजार गरजू कुटुंबीयांना मदत, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप - वाढदिवस खर्च
युवासेना अधिकारी सुमित सुभाष भोईर यांनी वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत तीन हजार गरजू कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन नवा आदर्श निर्माण केला आहे.

जनतेची होणारी दैना पाहून माजी आमदार सुभाष भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमित सुभाष भोईर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून कल्याण ग्रामीण मतदारसंघातील विविध भागांतील तीन हजार कुटुंबीयांना किराणा मालाचे वाटप करुन सामाजिक बांधिलकीचे जपली आहे.
यामध्ये तांदूळ, डाळ, साखर, तेल, कांदे, बटाटे, मसाला, हळद, मीठ आदी जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. त्याचा लाभ गरजू कुटुंबांना झाला आहे. सुभाष भोईर फाऊंडेशन मार्फत कल्याण ग्रामीण मतदार संघातील कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस बांधवाना, वाहतूक शाखा, अग्निशमन आधिकारी व कर्मचारी तसेच गरजू व्यक्तींना मास्क, सॅनिटायझर, तसेच २५ मार्च पासून दररोज एक हजार जेवणाचे व पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात येत आहे.