ठाणे :सध्या लोकसंख्येत ज्याप्रमाणे वाढ होत आहे त्याप्रमाणे वाहनांची संख्येमध्ये वाढ होत आहे. निसर्गातील झाडांची संख्येत देखील कमालीची घट होत आहे. यामुळे थेट परिणाम होत आहे तो म्हणजे पर्यावर्णावर. यामुळे हवेचे प्रदूषण मोठया प्रमाणात वाढ होत आहे. भविष्यात महाराष्ट्रात देखील दिल्ली सारखी परिस्तिथी उद्भवू शकते. याच प्रदूषणावर उपाय म्हणून ७२ वर्षीय अस्लम शेख यांनी स्वतः मेहनत घेत हवा शुद्ध करण्याची मशीन बनवली. तब्बल ४ वर्षांच्या अथक प्रयत्नातून ही मशीन त्यांनी बनवली असून ठाण्यातील तीन हात नका सिग्नल जवळ अस्लम शेख बनवलेली मशीन कार्यरत आहे. आता या मशीनला पेटंट ही मिळाले आहे त्यामुळे या काकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
हवा शुद्ध करणारी मशीन: या मशीनचा फायदा हवा प्रदूषणातून मुक्त करण्यासाठी तर आहेच पण अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना देखील उपयुक्त आहे. रुग्णालयातील बर्न वार्डमध्ये देखील फायदेशीर ठरू शकते, असे अस्लम शेख यांनी सांगितले. महापालिकेने या मशीनची पाहणी करून चांगला उपयोग होत असल्याचे नमूद केले आहे. ही मशीन प्रमाणित करण्यासाठी सांगण्यात आले, मात्र शासनाकडून कोणतीही मदत होत नसल्याची खंत शेख काकांनी व्यक्त केली. तर येत्या काळात सरकारने मदत द्यावी, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. या मशीन साठी त्यांना पेटंट मिळाले असून शासनाकडून याची दाखल घेतली जावी, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. येत्या काळात अशी मशीन शुद्ध हवेसाठी उपयुक्त ठरू शकते.