नवी मुंबई - सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे हत्याकांडाचे तपास अधिकारी असणारे सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांची अचानक गृह विभागाने बदली केल्याने गोरे व बिद्रे कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात एकीकडे कोरोनामुळे आणीबाणीची परिस्थिती असताना गृह विभाग असा निर्णय घेऊच कसा शकतो? असा प्रश्नही अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.
अश्विनी बिद्रे हत्याकांडाचे तपासाधिकारी सतीश गोवेकर यांची बदली - सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर
सहायक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण हे अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर आणि त्यांचे भाऊ सहायक पोलीस आयुक्त संजय कुरुंदकर यांचे बॅचमेंट असून हे तिघेही जीवलग मित्र असल्याचे संपूर्ण पोलीस खात्याला माहिती असून देखीलही बदली का करण्यात आली? तसेच चव्हाण यांच्याकडे जर तपासाची सूत्रे दिली तर आपल्याला न्याय मिळणार नाही, अशी भीतीही बीद्रे व गोरे कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
तीन महिन्यांपूर्वी सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्याकडे अश्विनी बिद्रे हत्याकांडाच्या तपासाची सूत्रे दिली होती. मात्र, आज (दि. 4 एप्रिल) अचानक त्यांची बदली पुण्याला करण्यात आली. या बदलीचे कारण गृहविभागाने मात्र गुलदस्त्यातच ठेवले आहे. तसेच सतीश गोवेकर यांच्या जागी त्याठिकाणी सहायक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण यांची नियुक्ती केली गेली आहे. सहायक पोलीस आयुक्त चव्हाण यांची बदली तीन महिन्यांपूर्वी नवी मुंबईतून लोहमार्ग मुंबई या ठिकाणी करण्यात आली होती. मात्र, ती बदली रद्द करुन विनोद चव्हाण हे तीन महिन्यातच नवी मुंबईत पुन्हा आले आहेत.
सहायक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण हे अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर आणि त्यांचे भाऊ सहायक पोलीस आयुक्त संजय कुरुंदकर यांचे बॅचमेंट असून हे तिघेही जीवलग मित्र असल्याचे संपूर्ण पोलीस खात्याला माहिती असून देखीलही बदली का करण्यात आली? तसेच चव्हाण यांच्याकडे जर तपासाची सूत्रे दिली तर आपल्याला न्याय मिळणार नाही, अशी भीतीही बीद्रे व गोरे कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा -अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण खटला दुसऱ्या न्यायाधीशांकडे वर्ग