पनवेल - सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांचे हत्या प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चिले गेले. यातील मुख्य आरोपी अभय कुरंदकर याने साक्षीदार आणि मृत अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांना चक्क न्यायालय परिसरातच धमकी दिली. ८ नोव्हेंबर रोजी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी पनवेल न्यायालयाबाहेर सुनावणीला आल्यानंतर हा प्रकार घडला. ‘तक्रारी करतोस काय, बघून घेतो’ अशी धमकी आरोपी अभय कुरंदकर याने दिली आहे. याबाबतीत अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी पनवेल सत्र न्यायालयतील न्यायाधीश राजेश अस्मर यांच्याकडे लेखी तक्रार दिली.
‘तक्रारी करतोस काय, बघून घेतो’; अश्विनी बिद्रेंच्या पतीला न्यायालय परिसरातच धमकी - thane latest news
आरोपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याने ११ एप्रिल २०१६ रोजी त्याच्या भाइंदर येथील निवासस्थानी अश्विनी बिद्रे यांची हत्या केली. साथीदारांच्या मदतीने त्यांच्या मृतदेहाची वसई खाडीत विल्हेवाट लावली, असा आरोप आहे.
हेही वाचा-पालघरमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या रॅगिंगप्रकणी १५ वरिष्ठ डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल
आरोपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याने ११ एप्रिल २०१६ रोजी त्याच्या भाइंदर येथील निवासस्थानी अश्विनी बिद्रे यांची हत्या केली. साथीदारांच्या मदतीने त्यांच्या मृतदेहाची वसई खाडीत विल्हेवाट लावली, असा आरोप आहे. या प्रकरणात कुरुंदकरसह ज्ञानदेव उर्फ राजू पाटील (भाजप नेते एकनाथ खडसे यांचा भाचा), कुरुंदकरचा खासगी वाहनचालक कुंदन भंडारी व बालमित्र महेश फळणीकर हे आरोपी आहेत.
पनवेलचे जिल्हा सत्र न्यायाधीश राजेश अस्मर यांच्या न्यायालयात या खटल्याबाबत सुनावणी सुरू आहे. 8 नोव्हेंबर रोजी अश्विनी बिद्रे यांचे बंधू आनंद बिद्रे यांची उलट तपासणी करण्यात आली. या सुनावणीसाठी स्वतः साक्षीदार आणि अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे हे पनवेल सत्र न्यायालयात उपस्थित होते. यावेळी आरोपी अभय कुरूंदकर याने आपल्याकडे रागाने पाहून, हे तक्रार करतात, यांना बघून घेतलेच पाहिजे, असे धमकावल्याचा आरोप राजू गोरे यांनी न्यायाधीशांकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे. या प्रकारानंतर राजू गोरे यांनी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांच्याशी सल्लामसलत केली. त्यानंतर शुक्रवारी न्यायाधीश राजेश अस्मर यांच्याकडे निवेदन वजा तक्रार सादर केली. या निवेदनात त्यांनी न्यायालयात सुनावणीच्या वेळी अभय कुरुंदकर व इतर आरोपींचे ४० ते ४५ नातेवाईक व गुंड प्रवृत्तीचे मित्र नेहमी हजर राहत असल्याचे तसेच ते आपल्याकडे रागाने बघून अप्रत्यक्षपणे दबाव आणत असल्याचे म्हटले आहे.
तसेच कामावरील पोलीस आरोपी कुरुंदकरला 'साहेब' म्हणून बोलावतात. कुटुंबीयांकडून आणलेल्या पिशव्या खाद्यपदार्थ न तपासता देतात. खुनातील आरोपीला अशी वागणूक दिली जात असल्याबद्दलही राजू गोरे यांनी तक्रारीतून आक्षेप घेतला आहे. यावेळी आरोपी अभय कुरंदकर धमकी देत असताना त्याच्यासोबत एक मुलगी ही होती. ‘हा तक्रारी करतो, याला बघून घ्यायला पाहिजे, काकांना सांगून एखाद्या गुन्ह्यात अडकवले पाहिजे’ असे वक्तव्य केले होते. अभय कुरुंदकर सोबत असणारी ती मुलगी कोण ? काका म्हणून तीने कोणाचा उल्लेख केला. याबाबत चौकशी व्हावी, असं देखील या तक्रारतीत म्हटलं आहे.