महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विविध मागण्यांसाठी आशा कर्मचाऱ्यांचे आंदोलन, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका - आशा कर्मचाऱ्यांचे आंदोलन ठाणे

8 ते 12 तास कोरोना संदर्भातील कामे करायची, आणि त्याबदल्यात केवळ दिवसाला 35 रुपये मानधन घ्यायचे. हे ऐकूणच धक्का बसतोना! हो हे मानधन आहे आशा वर्कर्सचे. कोरोनाला रोखण्यासाठी 'माझे कुटुंब माझी जबादारी' ही मोहीम सफल करण्यात सर्वात मोठा वाटा होता तो म्हणजे आशा वर्कर्सचा. असे असतानाही त्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे.

विविध मागण्यांसाठी ठाण्यात आशा कर्मचाऱ्यांचे आंदोलन
विविध मागण्यांसाठी ठाण्यात आशा कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By

Published : Jun 15, 2021, 11:05 PM IST

ठाणे -8 ते 12 तास कोरोना संदर्भातील कामे करायची, आणि त्याबदल्यात केवळ दिवसाला 35 रुपये मानधन घ्यायचे. हे ऐकूणच धक्का बसतोना! हो हे मानधन आहे आशा वर्कर्सचे. कोरोनाला रोखण्यासाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीम सफल करण्यात सर्वात मोठा वाटा होता तो म्हणजे आशा वर्कर्सचा. असे असतानाही त्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. नेमक्या काय आहेत त्यांच्या अडचणी, काय आहेत त्यांच्या मागण्या यावरील हा धक्कादायक रिपोर्ट

कोरोनामुळे सर्व जगच थांबले होते. कोरोनाची पहिली लाट त्या नंतर दुसरी लाट आणि त्याचे दुष्परिणाम यामध्ये सर्वच लोक त्रस्त होते. कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य कर्मचारी रात्रीचा दिवस करत होते. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीम सुरू केली, ही मोहीम यशस्वी देखील झाली. या मोहिमेला यशस्वी करण्यामध्ये आशा वर्कर्सचे महत्त्वाचे योगदान होते. या मोहिमेदरम्यान त्यांनी घरोघरी जाऊन, लोकांच्या आरोग्याची माहिती शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम केले. एका आशाला किमान ५० घरे रोज करावी लागतात. याशिवाय आरोग्य केंद्रावर जाऊन लसीकरणापासून ते रुग्णतपासणीत मदत करावी लागते. शिवाय आरोग्य विभागाचे डॉक्टर सोपवतील ती कामे करावी लागतात. साधारणपणे ८ ते १२ तास काम करून घेतले जाते. मात्र त्याबदल्यात त्याला महिन्याला केवळ 1 हजार रुपये म्हणजे दिवसाला 35 रुपये मानधन दिले जाते. तसेच त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबासाठी कोणतेही विम्याचे सुरक्षा कवच देण्यात आलेले नाही. शासनाने आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, तसेच किमान महिन्याला 18 हजार रुपये वेतन द्यावे अशी मागणी आशा कर्मचाऱ्यांनी केली आहे.

विविध मागण्यांसाठी ठाण्यात आशा कर्मचाऱ्यांचे आंदोलन

साधन सामुग्रीचा आभाव

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात मास्क, हातमोजे, सॅनिटाइजर अशा सुरक्षीततेच्या साधनांचे वाटप या आशा कर्मचाऱ्यांना करण्यात आले. मात्र नंतरच्या काळामध्ये यातील अनेक आशा कर्मचाऱ्यांना या साधनाशिवाय काम करावे लागले. शासनाकडून देखील त्यांना केवळ दिवसाला 35 रुपये एवढेच मानधन मिळत आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details