ठाणे : मध्य रेल्वेच्या कल्याण - कसारा मार्गावरील आसनगाव स्थानकात वारंवार उशिरा लोकल येत ( Local Late Arrive At Asangaon Railway Station )असल्याने चाकरमान्यांसह प्रवाशांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी उशीर होत असल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या महिन्याभरात लोकल उशिरा येत असल्याच्या कारणावरून प्रवाशांनी याच मार्गावर तीन वेळा रेल रोको ( Asangaon Railway Passengers Rail Roko Andolan ) केल्याची माहिती कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघावत यांनी सांगितले आहे.
Rail Roko Andolan : मध्य रेल्वच्या आसनगाव स्थानकात प्रवाशांचा रेल रोको; महिन्याभरातील तिसरी घटना - Asangaon Railway Passengers
आसनगाव रेल्वे स्थानकात लोकल उशिरा येत असल्याने रेल्वे प्रवाशांनी रेल रोको आंदोलन ( Asangaon Railway Passengers Rail Roko Andolan ) केले. महिन्याभरातील तिसरी घटना
कल्याण कसारा मार्गावर आंदोलन : मध्य रेल्वेच्या कल्याण कसारा मार्गावरील अनेक रेल्वे स्थानकात या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडे विविध रेल्वे संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला ( Passengers Protest At Asangaon Station ) आहे. विशेषतः सकाळच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल उशिरा आसनगाव स्थानकात येत असल्याने आज कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशन संघटनेच्या माध्यमातून आसनगाव स्थानकात रेल्वे रुळावर उतरून लोकल समोर रेल रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी काही वेळ लोकल थांबवण्यात आली. त्यानंतर आरपीएफच्या मध्यस्थीने हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात रेल्वे पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशन व शेकडो प्रवासी सहभागी झाले होते.