महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडी-वसई रस्त्यावरील खड्ड्याने घेतला कला दिग्दर्शकाचा बळी - Thane Harsh Vinod Singh Accident News

वसई रोडवरील कालवार गावाच्या हद्दीतील रोडवरील एका खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने त्या खड्ड्यात दुचाकी आदळून दुभाजकाला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील कला दिग्दर्शक (आर्ट डायरेक्टर) जागीच ठार झाला. या खड्ड्यांनी यापूर्वीही नागरिकांचे नाहक बळी घेतले आहेत. रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत नाही आणि टोल वसुली कायम असल्याने शासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ठाणे हर्ष विनोद सिंह अपघात न्यूज
ठाणे हर्ष विनोद सिंह अपघात न्यूज

By

Published : Sep 26, 2020, 2:28 PM IST

ठाणे (भिवंडी) - वसई रोडवरील कालवार गावाच्या हद्दीतील रोडवरील एका खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने त्या खड्ड्यात दुचाकी आदळून दुभाजकाला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील कला दिग्दर्शक (आर्ट डायरेक्टर) जागीच ठार झाला.

हर्ष विनोद सिंह (26 रा. ठाणे ) असे मृत्यू झालेल्या कला दिग्दर्शकाचे नाव आहे. तो नायगाव इथं शूटिंगचे लोकेशन पाहण्यासाठी भिवंडी-वसई मार्गाने जात असताना त्याच्यावर काळाने घाला घातला आहे. खड्ड्यामुळे अपघात झाला त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी नोंद केली आहे.

भिवंडी-वसई रस्त्यावरील खड्ड्याने घेतला कला दिग्दर्शकाचा बळी

दरम्यान, भिवंडी तालुक्यातील माणकोली ते चिंचोटी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पाहवयास मिळत आहे. या खड्ड्यांनी यापूर्वीही नागरिकांचे नाहक बळी घेतले आहेत. गेल्याच पावसाळ्यात ग्रामस्थांनी खड्ड्याविरोधात रस्तावर उतरून आंदोलन करीत या मार्गावरील टोल नाका बंद केला होता. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने मध्यस्ती करीत खड्डे दुरुस्ती तातडीने करण्यात येणार असल्याचे सांगत आंदोलन मागे घेण्याची विनंती त्यावेळी केली होती. मात्र, आता पुन्हा या मार्गावर यंदाच्या पावसाळ्यातही खड्ड्यांनी डोकेवर काढले आहे. तरीही रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत नाही आणि टोल वसुली कायम असल्याने शासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details