ठाणे- भिवंडीतील हनुमान टेकडी परिसरात देहव्यापर करणाऱ्या 25 वर्षीय तरुणीची गुरुवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात ग्राहकांनी तिच्या राहत्या घरात हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या हत्येचा छडा लावण्यात भिवंडी शहर पोलिसांना चोवीस तासाच्या आत यश मिळाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यो दोघांनी हत्येपूर्वी तरुणीवर बलात्कार केला. नंतर तिची गळा आवळून हत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार २५ वर्षीय तरुणीची भिवंडीतील आसबीबी परिसरात असलेल्या हनुमान टेकडी या भागात राहून देहव्यापार करत होती. गुरुवारी रात्रीच्या सुमाराला या मृत तरुणीच्या खोलीत तीन ग्राहक आल्याची माहिती सांगण्यात आली. त्यामुळे या अज्ञात ग्राहकांवर तिच्या हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत होता. आरोपींनी देहव्यापार करणाऱ्या या तरुणीच्या गुप्तांगास इजा पोहोचवून तिची गळा आवळून हत्या केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा २४ तासाच्या आताच छडा लावला आहे.