महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रवादीच्या कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्षपदी जगन्नाथ शिंदेंची निवड

राष्ट्रवादीच्या कल्याण - डोंबिवली जिल्हाध्यक्षपदी आमदार जगन्नाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील यांनी नियुक्तीपत्र दिले.

जगन्नाथ शिंदेंची राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड
Jagannath Shinde new NCP District President

By

Published : Nov 25, 2020, 6:11 PM IST

ठाणे -राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्याण - डोंबिवली जिल्हाध्यक्षपदाचा तिढा अखेर सुटला आहे. आमदार जगन्नाथ शिंदे यांची एकमताने राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांना राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील यांनी नियुक्तीपत्र दिले.

विशेष म्हणजे, महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे हे कल्याणमध्ये आले होते. त्यांनी जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीवरून कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली होती. त्यामधून एकमताने आमदार जगन्नाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

शिंदेंवर राष्ट्रवादीला महापालिकेत यश मिळून देण्याची जबाबदारी

सर्वात प्रथम राष्ट्रवादीने जेव्हा कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक लढवली, तेव्हा महापालिकेत राष्ट्रवादीचे 10 नगरसेवक होते. त्यानंतर पुडंलिक म्हात्रे जिल्हाध्यक्ष असताना राष्ट्रवादीचे 16 नगरसेवक निवडून आले. 2008 साली राष्ट्रवादीने अपक्ष नगरसेवकांची मदत घेऊन, महापालिकेत सत्ता स्थापन केली होती. आता येणाऱ्या निवडणुकीची सर्व जबाबदारी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्यावर असणार आहे.

गटबाजीला कंटाळून पुडंलिक म्हात्रेंची पक्षाला सोडचिठ्ठी

अडीच वर्ष पुडंलिक म्हात्रे यांनी राष्ट्रवादीचे महापौर म्हणून पदभार सांभाळा होता. मात्र कालांतराने पुडंलिक म्हात्रे यांनी पक्षातील गटबाजीला कंटाळून पक्षाला सोडचिठ्ठी देत, ४ नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला होता. तेव्हापासूनच राष्ट्रवादीला स्थानिक पातळीवर उतरती कळा लागली होती. मात्र राज्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी सत्तेत आल्याने कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. याचा फायदा राष्ट्रवादीला येणाऱ्या निवडणुकीत होऊ शकतो.

हेही वाचा -बिहार निवडणूक आणि दिवाळीनंतर बांधकाम परप्रांतीय मजूर राज्यात परतण्यास सुरुवात

हेही वाचा -वीजबिल प्रश्नी कोल्हापुरातून २८ नोव्हेंबरपासून 'गावं बंद'ची हाक

ABOUT THE AUTHOR

...view details