ठाणे- महापालिकेच्या परिवहन समितीच्या सदस्यत्वासाठी येत्या ४ मार्चला निवडणूक होणार आहे. महापालिकेच्या परिवहन समिती सदस्यत्वाच्या १२ जागांसाठी १४ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत. शिवसेनेने या निवडणुकीत ७, राष्ट्रवादीने ४, भारतीय जनता पक्षाने २ तर काँग्रेसने एकाला उमेदवारी दिली आहे.
ठाणे परिवहन निवडणुकीसाठी अर्ज दाखल; जागांपेक्षा अर्ज जास्त आल्याने पक्षांची वाढली डोकेदुःखी - ठाणे
परिवहन समिती सदस्यत्वासाठी गुप्त मतदानाने निवड होणार आहे. शिवसेनेतर्फे विलास जोशी, पूजा वाघ, बालाजी काकडे, प्रकाश कोटवानी, तानाजी पाटील, मिलिंद मोरे आणि राजेंद्र महाडीक अशा ७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
परिवहन समिती सदस्यत्वासाठी गुप्त मतदानाने निवड होणार आहे. शिवसेनेतर्फे विलास जोशी, पूजा वाघ, बालाजी काकडे, प्रकाश कोटवानी, तानाजी पाटील, मिलिंद मोरे आणि राजेंद्र महाडीक अशा ७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादीतर्फे नितीन पाटील, प्रकाश पाटील, मोहसिन शेख आणि शमीम खान, भारतीय जनता पक्षातर्फे सुरेश कोलते आणि विकास पाटील तर काँग्रेसतर्फे राम भोसले यांनी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांशिवाय इतर नागरिकांनी देखील अर्ज केला आहे. त्यामुळे, आता या निवडणुकीकडे सर्व पक्षांचे लक्ष लागले असून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या लोकांना अर्ज मागे घेण्यासाठी दबाव देखील टाकला जात आहे.