महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा परिणाम : एपीएमसी मार्केट सुरू झाले; पण मजुरासह ग्राहक नसल्याने माल 'पडून' - कोरोना संसर्ग

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे सात दिवस मार्केट बंद ठेवून आज अखेर मार्केट सुरू करण्यात आले आहे. मात्र ग्राहक व मजूर नसल्याने भाजीपाला मार्केटमधील माल तसाच पडून आहे.

Market
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पडून असलेला भाजीपाला

By

Published : May 18, 2020, 7:30 PM IST

Updated : May 18, 2020, 9:28 PM IST

नवी मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढता संसर्ग पाहता 11 ते 17 मे या कालावधीत नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) बंद करण्याचा निर्णय प्रशासन व बाजार समितीच्या माध्यमातून घेण्यात आला. त्यानुसार सात दिवस मार्केट बंद ठेवून आज अखेर मार्केट सुरू करण्यात आले आहे. मात्र ग्राहक व मजूर नसल्याने भाजीपाला मार्केटमधील माल तसाच पडून आहे.

कोरोनाचा परिणाम; एपीएमसी मार्केट सुरू झाले; पण मजुरासह ग्राहक नसल्याने माल 'पडून'

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आतापर्यंत व्यापारी, माथाडी, मापाडी, कार्यालयीन कर्मचारी, सुरक्षा रक्षक, ग्राहक, दलाल, व निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा झाली आहे. एपीएमसी मार्केटमध्ये वाढता कोरोनाचा प्रसार रोखता यावा, त्या अनुषंगाने 11 ते 17 मे या कालावधीत सात दिवस मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सात दिवस पूर्ण झाल्यानंतर आजपासून मार्केट सुरू करण्यात आले आहे. त्यात भाजीपाला मार्केट, अन्नधान्य मार्केट, मसाला मार्केटचा समावेश आहे.

आज भाजीपाला मार्केटमध्ये 92 गाड्यांची आवक झाली आहे. मात्र बाजार समितीत माल उचलण्यासाठी मजूर व माल घेण्यासाठी ग्राहक नसल्याने कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी व इतर भाज्या तशाच पडून आहेत. खूप दिवसांनी मार्केट सुरू झाल्यानंतर बाजार समितीकडून काळजी घेण्यात येत असून मार्केटच्या प्रवेशद्वारावर येणाऱ्या ग्राहकांची स्क्रीनिंग करण्यात येत आहे. आतापर्यंत 1999 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये दहा जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांची रवानगी रुग्णालयात करण्यात आली.

Last Updated : May 18, 2020, 9:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details