नवी मुंबई - 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला होता. मात्र, नागरिकांची होणारी गैरसोय पाहता पुन्हा एकदा हा बाजार (मार्केट) सुरू करण्याचा निर्णय बाजार समितीच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. बाजारातील गर्दी पाहता व्यापाऱ्यांनी तो बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आज हा बाजार पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
नवी मुंबईत पुन्हा परत एकदा एपीएमसी मार्केट सुरू; गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 'ड्रोन'चा वापर - apmc market committee
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील भाजीपाला, फळ मार्केट गर्दीवर नियंत्रण राखण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. येथील बाजारात अधिक गर्दी होऊ नये? तसेच ही गर्दी होते आहे की नाही? हे पाहण्यासाठी एपीएमसी पोलीस ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवत आहेत. ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने 800 एकरच्या एपीएमसी मार्केटमध्ये गर्दी होणार नाही, याची पोलिसांच्या माध्यमातून खबरदारी घेण्यात येत आहे.
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील भाजीपाला, फळ मार्केट गर्दीवर नियंत्रण राखण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. येथील बाजारात अधिक गर्दी होऊ नये? तसेच ही गर्दी होते आहे की नाही? हे पाहण्यासाठी एपीएमसी पोलीस ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवत आहेत. ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने 800 एकरच्या एपीएमसी मार्केटमध्ये गर्दी होणार नाही, याची पोलिसांच्या माध्यमातून खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच जो कोणी सोशल डिंस्टन्सिंगचे पालन करणार नाही, त्यांच्यावर पोलिसांच्या माध्यमातून गुन्हे नोंद करण्यात येणार आहे. तसेच या परिसरात होणाऱ्या गाड्यांची आवक मर्यादेत ठेवण्याच्या सुचनाही प्रशासनाकडून व्यापारी वर्गाला देण्यात आल्या आहेत. तर आज (बुधवारी) बाजार समितीमध्ये 170 गाड्यांची आवक झाली आहे.
हेही वाचा -वेगळा रंग देवून आग लावण्याचा प्रयत्न कोण करणार असेल तर याद राखा !