महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जामिनावर सुटताच अर्णब यांच्याकडून 'भारत माता की जय'च्या घोषणा - Arnab Goswami released from jail

अर्णब गोस्वामी यांना आज अखेर जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर त्यांची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. सुटका झाल्यानंतर त्यांनी बाहेर पडताना वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या.

Arnab Goswami News Update
जामिनावर सुटताच अर्णब यांच्याकडून वंदे मातरम, भारत माता की जयच्या घोषणा

By

Published : Nov 11, 2020, 10:53 PM IST

नवी मुंबई -अर्णब गोस्वामी यांना आज अखेर जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर त्यांची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. सुटका झाल्यानंतर त्यांनी बाहेर पडताना वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. तसेच गोस्वामी यांचे स्वागत करण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी कारागृहाबाहेर गर्दी केली होती. अंगावर फूले टाकून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ते आपल्या मुंबईकडे रवाना झाले.

जामिनावर सुटताच अर्णब यांच्याकडून वंदे मातरम, भारत माता की जयच्या घोषणा

मागील सात दिवसांपासून अर्णब गोस्वामी हे न्यायालयीन कोठडीत होते. त्यांची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली होती. दरम्यान सुप्रीम कोर्टाने पन्नास हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना आज अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे गोस्वामी यांना दिलासा मिळाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details