ठाणे- मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे वांगणी ते बदलापूर भागात चांगलाच पूर आला आहे. याच भागातील अंपग प्राण्यांच्या आश्रमामध्ये अडकलेल्या प्राण्यांना वाचवण्यात महाराष्ट्र आर. एस. ग्रुप, स्थानिक गावकरी आणि प्राणीमित्रांना यश आले आहे.
वांगणीच्या पुरात अडकलेल्या अपंग प्राण्यांची सुखरूप सुटका
वांगणी भागात अपंग प्राण्यांसाठी एक अनाथ आश्रम आहे. हे अनाथआश्रम देखील पाण्यात पूर्णपणे बुडाले आहे. त्यामुळे या आश्रमातील काही प्राणी वाहून गेले आहेत. मात्र, काही प्राण्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
वांगणीच्या पुरात अडकलेल्या अपंग प्राण्यांची सुखरूप सुटका
वांगणी ते बदलापूर भागात मुंबई ते कोल्हापूर जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली होती. त्यामध्ये एकूण ७०० प्रवाशी अडकले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. मात्र, याच भागात अपंग प्राण्यांसाठी एक अनाथ आश्रम आहे. हे अनाथआश्रम देखील पाण्यात पूर्णपणे बुडाले आहे. त्यामुळे या आश्रमातील काही प्राणी वाहून गेले आहेत. मात्र, काही प्राण्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.