महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Rural Crime : ग्रामीण भागात गुरं चोरांच्या टोळीचा सुळसुळाट, शेतकरी चिंतेत - Crime

रात्रीच्या वेळी येऊन गोठ्यातून जनावरे चोरून घेऊन जात असल्याने पशुपालक शेतकऱ्या समोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून देखील पोलिस तपासाला येत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

Thane Crime
चोरांच्या टोळीचा सुळसुळाट,

By

Published : Jul 3, 2022, 5:30 PM IST

Updated : Jul 3, 2022, 7:46 PM IST

ठाणे -ग्रामीण भागात गाय, बैल, म्हशी चोरीचे ( Thief ) प्रमाण वाढल्याने पशुपालक शेतकरी ( Farmers ) चिंतेत असल्याची बाब पुन्हा समोर आली आहे. शहापूर तालुक्यातील खर्डी प्रधानपाडा येथे राहणाऱ्या किसन टेकनर यांच्या गोठ्यातून आज पहाटे 2 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी 2 दुभत्या म्हशी व 2 गाभण गाय, अशी जनावरांचा दाेर कापून चोरून नेली आहेत. या याप्रकरणी खर्डी पोलिस ठाण्यात ( Khardi police station ) टेकनर यांनी अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

चोरांच्या टोळीचा सुळसुळाट,

3 लाखांहून अधिक किंमतीचे जनावरं चोरीला - एकीकडे पावसाळयात शेतीचे कामे सुरु असतानाच अश्या प्रकारचे रात्रीच्या वेळी येऊन गोठ्यातून जनावरे चोरून घेऊन जात असल्याने पशुपालक शेतकऱ्या समोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून देखील पोलिस तपासाला येत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना मध्ये नाराजी पसरली आहे. एका दुभत्या म्हशीची किंमत 1 लाखाहून अधिक आहे, तर 4 जनावरांची किंमत 3 लाखांहून अधिक असल्याची माहिती शेतकरी टेकनर यांनी दिली आहे.

Last Updated : Jul 3, 2022, 7:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details