महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Amruta Fadnavis Blackmail Case : पत्रकारितेच्या आडून अनिल जयसिंघानी बनला इंटरनॅशनल बुकी; ब्लॅकमेल प्रकरणी धक्कादायक खुलासे समोर

अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणारी अनिक्षा ही अनिल भगवानदास जयसिंघानी याची मुलगी असल्याचे नुकतेच समोर आले. जयसिंघानी पत्रकारितेच्या आडून इंटरनॅशनल बुकी बनला, अशी माहिती समोर आली आहे. जयसिंघानीने माजी पोलिस उपायुक्त अमर जाधववर साप्ताहिकाच्या माध्यमातून मोठे आरोप केले होते. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची चौकशीला सुरूवात झाली आहे तसेच बदनामीच्या मागे कोण आहे, याचा देखील पोलिस शोध घेत असल्याचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Jaisinghani
जयसिंघानी

By

Published : Mar 18, 2023, 8:58 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संवाद साधताना

ठाणे :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणारी अनिक्षा ही उल्हासनगर मध्ये राहणाऱ्या इंटरनॅशनल क्रिकेट बुकी अनिल भगवानदास जयसिंघानी याची मुलगी असल्याचे नुकतेच समोर आले. मात्र, याच अनिल जयसिंघानी उर्फ सुनील सिल्वर हा बुकी असतानाच, माजी पोलीस उपाआयुक्त अमर जाधव यांच्यावर गंभीर आरोप करून त्यांची तक्रार ५ जानेवारी २०१५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे होती. मात्र, त्या तक्रारीची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करून जाधव यांना क्लीन चिट देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले? :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबरनाथमध्ये शिव फेस्टिव्हलच्या कार्यक्रमात शुक्रवारी आले होते. त्यावेळी ते म्हणाले की, कालच उपमुख्यमंत्री फडवणीस यांनी विधिमंडळात या ब्लॅकमेलिंग प्रकरणी प्रश्न उपस्थित करत चौकशीचे आदेश दिले आहेत. जयसिंघानी हा सर्वच राजकीय पक्ष फिरून आला. विशेतः महाविकास आघाडीत होता. त्याचीही संपूर्ण खोलात चौकशी केली जाईल तसेच नाहक बदनामीच्या मागे कोण आहे, त्याच्याही शोध पोलीस घेत असल्याचे सांगितले.

जयसिंघानीचे राजकीय नेत्यांशी संबंध : विशेष म्हणजे जयसिंघानी हा आठ वर्षापासून पोलीस रेकॉर्डवर फरार असून त्याच्यावर डझनभर गुन्हे दाखल आहेत. शिवाय जयसिंघानी याचे अनेक राजकीय बड्या नेत्यांशी नजीकचे संबध असल्याचेही समोर आले. तसेच जयसिंघानी आणि त्याची पत्नी २०१२ साली उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांनतर २०१४ साली विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युती तुटल्याने जयसिंघानीने शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, त्यानंतर तो पोलीस रेकॉर्डवर फरार असल्याचे दिसून आले आहे.

पत्रकारितेच्या आडून गोरखधंदा : विशेष म्हणजे अनिल जयसिंघानी उर्फ सुनील सिल्वर एकीकडे बुकीचा गोरखधंदा करीत असतानाच, ‘ॲटम’ आणि ‘टाऊन दर्शन’ नावाने दोन साप्ताहिक काढून त्याचा संपादक म्हणून बातम्या प्रसिद्ध करत होता. त्यातच ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त शंगारी हे भ्रष्ट्राचारी असून त्यांचे हफ्ता कलेक्टरचे म्हणून पोलीस उपआयुक्त अमर जाधव काम करतात, अशी बातमी साप्ताहिक ‘ॲटम’ मध्ये २००१ साली प्रसिद्ध केली होती.

यानंतर झाले होती छापेमारी : त्याच याच बातमीमुळे ठाणे पोलीस बुकी जयसिंघानीच्या हालचालीवर नजर ठेवून होती. त्यातच अमर जाधव हे ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त असताना २००२ साली ऑगस्ट व सप्टेंबरला जयसिंघानीच्या क्रिकेट बेंटिगच्या ठिकाणी छापेमारी करून त्याच्यासह साथीदारांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र या गुन्ह्यात अटक होऊ नये म्हणून जयसिंघानी याने उच्च न्यायालयातून अटक पूर्व जामीन मंजूर केला होता.

जयसिंघानीने केले होते आरोप :दरम्यानच्या काळात बातमी विरोधात प्रसिद्ध केली म्हणून नाराजी व्यक्त करून माझ्या बेंटिगच्या गोरखधंदावर पोलीस अधिकारी अमर जाधव यांनी छापेमारी केल्याचा आरोप अनिल जयसिंघानीने केला होता. त्यानंतर अमर जाधव हे मुंबई गुन्हे शाखा ७ ते १२ चे पोलीस उपआयुक्त असताना मुंबईच्या पश्चिम उपनगरातील एव्हियन हॉटेलमधील बेंटिगच्या गोरखधंदावर धाड टाकून जयसिंघानीसह त्याच्या साथीदारांवर गुन्हे दाखल करून मुद्देमाल जप्त केला होता. मात्र याच कालावधीत २६ सप्टेंबर २००९ मध्ये अनिल जयसिंघानी यांनी पोलीस उपायुक्त अमर जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अमर जाधव आणि दोन पोलीस अधिकाऱ्यांनी मला आणि माझ्या ९ वर्षांच्या मुलाचे अपहरण केले होते. त्यांनी आम्हाला हॉटेलच्या एका रुममध्ये कोंडून ठेवलं होते. माझ्यासाठी क्रिकेट बेटिंग केले नाहीस तर तुझ्या मुलाला गोळ्या घालेन, अशी धमकी अमर जाधव यांनी दिल्याचा दावा अनिल जयसिंघानी करत याची तक्रार अर्ज उच्च न्यायालयात दाखल केला होता.

आरोप ठरले होते निष्फळ :त्याचप्रमाणे त्यावेळी मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रार दिल्यानंतर या प्रकरणात फडणवीस यांनी हस्तक्षेप करत मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना याप्रकरणी कारवाई करण्यास सांगितले. मारिया यांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे पाठवून चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले होते. मुंबई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त के. एम. एम. प्रसन्ना यांनी चौकशी सुरू केली असता, जयसिंघानी आणि त्याची पत्नी करिश्माचे जबाब नोंदवले. तसेच जयसिंघानी याने अमर जाधवसह छापेमारी करणाऱ्या इतरही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केल्याने जाधवसह त्यावेळेच्या पोलीस पथकातील अधिकारी कर्मचाऱ्याचे जबाब नोंदविण्यात येऊन अखेरीस अमर जाधव यांच्यावर जयसिंघानी केलेल्या आरोप आणि तक्रारीची संपूर्ण शहानिशा करून पोलीस अधिकारी प्रसन्ना यांनी अमर जाधव यांना त्यावेळी क्लीन चिट दिली होती.

अमर जाधवांनी केला होता अर्ज :चौकशीच्या काळात एक जून २०११ रोजी अमर जाधव हे रजेवर गेले. त्यानंतर ते पुन्हा खात्यात हजर झाले नाही. शिवाय दरम्यानच्या काळातच काही महिन्यापूर्वी त्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी गृह विभागाकडे अर्ज केला होता. त्यांच्या दिर्घ रजेतील तीन वर्षाचा कालावधी हा आयपीएस अधिकाऱ्यासाठी तरतूद असलेल्या अभ्यास रजेमध्ये वर्ग करण्यात आला. त्यानंतर ‘व्हीआरएस’साठीचे निकष पुर्ण झाल्याने त्यांचा अर्ज मंजूर करुन केंद्रीय गृह विभागाकडून त्याला मान्यता मिळविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका 'डिझायनर'विरोधात एफआयआर दाखल केली आहे. तिच्यावर कट रचणे, धमकावणे आणि एक कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमृताने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये डिझायनरचे नाव अनिक्षा जयसिंघानी असं आहे. एका फौजदारी खटल्यात हस्तक्षेप करण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अनिक्षावर आहे. अनिक्षा जवळपास 16 महिन्यांपासून अमृत फडणवीसांच्या संपर्कात होती आणि ती त्यांच्या घरीही येत होते.

हेही वाचा : Devendra Fadnavis On Amruta Fadnavis : अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणी उपमुख्यमंत्र्यांचा खुलासा, पाहा संपूर्ण व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details