महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MAN KILLS WIFE : जेवणात जास्त मीठ टाकल्याने संतापलेल्या पतीने केली पत्नीची हत्या

ठाणे जिल्हात दोन दिवसांत छोट्याश्या गोष्टीमुळे रागाच्या भरात दोन खुन (Two murders in anger) झाल्याचे समोर आले आहे. गुरुवारी वेळेवर नास्ता न मिळाल्याने संतापलेल्या सासऱ्याने सुनेची गोळ्या झाडून हत्या केली, तर शुक्रवारी खिचडीत जास्त मीठ टाकल्याने संतापलेल्या (ANGRY OVER EXCESS SALT IN FOOD) पतीने पत्नीची हत्या (MAN KILLS WIFE) केली.

MAN KILLS WIFE
पतीने केली पत्नीची हत्या

By

Published : Apr 16, 2022, 1:09 PM IST

Updated : Apr 16, 2022, 1:24 PM IST

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील भाईंदर बस्ती येथे एका व्यक्तीने आपल्या ४० वर्षीय पत्नीचा गळा दाबून खून (MAN KILLS WIFE) केला. बायकोचा दोष एवढाच होता की तीने तयार केलेल्या नाश्त्यात जास्त मीठ टाकले (EXCESS SALT IN FOOD) होते. पोलिसांनी शनिवारी या हत्येची माहिती दिली. ही घटना शुक्रवारी सकाळी भाईंदर पूर्वेतील फाटक रोड परिसरात घडली. मात्र, पोलिसांनी आरोपी मारेकरी पतीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 46 वर्षीय नीलेश घाघ याने सकाळी 9.30 च्या सुमारास नाश्ता केल्यानंतर पत्नी निर्मला यांचा गळा दाबून खून केला. पत्नीने बनवलेल्या 'खिचडी'मध्ये जास्त मीठ टाकल्याने ते नाराज झाले. रागाच्या भरात नीलेशने कपड्याच्या दुपट्ट्याने पत्नीचा गळा आवळून खून केला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला.निलेशला कोणीतरी हल्ला किंवा खून करण्यास प्रवृत्त केले होते का, याचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.

भायंदरमधील नवघर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३०२ (हत्या) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशीच एक घटना गुरुवारी घडली ज्यात एका महिलेची सासऱ्याने सुनेची गोळ्या झाडून हत्या केली. पीडितेने सासऱ्याला वेळेत चहा नाश्ता न दिल्याने सासऱ्यांना राग आला होता. राबोडी भागातील रहिवासी असलेल्या या 42 वर्षीय महिलेच्या पोटात गोळी लागली आणि शुक्रवारी सकाळी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा धक्कादायक.. सासऱ्याला दिला नाही वेळेवर नाश्ता.. सुनेवर रिव्हॉल्व्हरमधून केला गोळीबार..

Last Updated : Apr 16, 2022, 1:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details