ठाणे - टिटवाळ्यानजीकच्या बल्याणी परिसरात मंगळवारी रात्रीपासून विजेचा लपंडाव सुरू होता. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी आज दुपारच्या सुमारास टिटवाळा महावितरण कार्यालयावर धडक देत, महावितरण अधिकाऱ्याला घेराव घातला.
टिटवाळ्यातील महावितरण कार्यालयावर संतप्त ग्राहकांचा धडक मोर्चा - officer
टिटवाळा पोलिसांनी वेळेतच धाव घेत संतप्त नागरिकांची समजूत काढत अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणली. यावेळी नागरिकांनी वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, फ्युज जाणे, वीज कर्मचारी वेळेवर सेवा न देणे, दुरुस्ती न करणे, कर्मचारी विद्युत ग्राहकांशी उद्धट बोलणे असे गाऱ्हाणे महावितरण अधिकाऱ्यांसमोर मांडली.
अचानक आलेल्या नागरिकांच्या जमावाला पाहून महावितरणच्या सुरक्षारक्षकाने वेळीच प्रवेश दारावर जमावाला रोखून धरल्याने पुढील अनर्थ टळला. विशेष म्हणजे टिटवाळा पोलिसांनी वेळेतच धाव घेत संतप्त नागरिकांची समजूत काढत अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणली. यावेळी नागरिकांनी वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, फ्युज जाणे, वीज कर्मचारी वेळेवर सेवा न देणे, दुरुस्ती न करणे, कर्मचारी विद्युत ग्राहकांशी उद्धट बोलणे असे गाऱ्हाणे महावितरण अधिकाऱ्यांसमोर मांडली. त्यानंतर महावितरण अधिकाऱ्याने नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत, यापुढे तक्रारीची दखल घेतली जाईल तसेच वीज कर्मचारी उद्धट वागणार नाही, असे आश्वासन दिल्याने संतप्त नागरिक शांत झाले होते.