ठाणे -दंगली, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराने एका १७ अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या ( Minor Girl Kidnap By Andapav ) जाळ्यात ओढून तिचे अपहरण करून पळवून नेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात ( Ullhasnagar Police Arrest Andapav ) अपहरण केल्याचा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करून उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरातमधील बडोदा शहरातून गुन्हेगाराला अटक केली आहे. संतोष बाबू सायअण्णा उर्फ अंडपाव असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार संतोष बाबू सायअण्णा उर्फ अंडपाव याने गेल्या महिन्यात कल्याण ग्रामीण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलावर प्राणघातक हल्ला करून फरार झाला होता. हा गुन्हेगार फरार असतानाच त्यानतर काही दिवसातच त्याने एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अपहरण केले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून उल्हासनगर व गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरु केला. पीडितेचे अपहरण करतेवेळी पोलीस आपला माग काढतील यासाठी त्याने मोबाईल बंद केला होता. तर त्याचा मोबाईल त्याचा नंबर कोणाकडे नसल्याने त्याचा तपास लागणे शक्य नव्हते. त्यासाठी पोलिसांनी सुरूवातीला मिळालेल्या माहितीवरून उत्तरप्रदेशमध्ये जाऊन शोध घेतला. मात्र, पोलिसांना गुंगारा देत तो पीडितेला घेऊन पसार झाला होता.
मोबाईल लोकेशनच्या आधारे गुजरातमधून अटक -