महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यातील ज्यू धर्मीयांचं प्रार्थना स्थळ बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा ई-मेल युरोपमधून आल्याचा खुलासा

Thane Terrorist Attack : ठाण्यातील ज्यू धार्मियांच्या प्रार्थनास्थळात (Jew Religion Place) बॉम्ब ठेवल्याचा इमेल प्राप्त झाल्याने, गुरुवारी शहरात मोठी खळबळ उडाली होती. पोलीस तपासातून हा मेल युरोपमधून आल्याचं समोर आलं आहे.

Thane Terrorist Attack
ज्यू धर्मीयांच्या प्रार्थना स्थळाला बॉम्बने उडवण्याची धमकी

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 30, 2023, 5:26 PM IST

ठाणेThane Terrorist Attack : गुरुवारी ठाण्यातील ज्यू प्रार्थनास्थळात (Jew Religion Place) बॉम्ब ठेवला असल्याचा ई-मेल आल्याने ठाण्यात एकच खळबळ उडाली होती. ठाण्यातील सिव्हल हॉस्पिटलजवळ असलेल्या ज्यूचे प्रार्थनास्थळ अर्थात सिनेगॉगमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल सीनेगॉग प्रशासनाला प्राप्त झाला होता. सध्या पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायलमध्ये युद्ध (Israel VS Hamas War) सुरू असताना जगभरातील सर्वच ज्यूच्या धार्मिकस्थळांना अतिरिक्त संरक्षण दिलं जात आहे.

सदरील ईमेलचा आयपी पत्ता युरोपमधील : इस्रायली दुतावासाच्या बाहेर घडलेल्या बॉम्बस्फोटानंतर आता सर्वच महत्त्वाच्या ठिकाणी कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यातच आलेल्या या ई-मेलमध्ये सदर इमारतीत बॉम्ब लपवून ठेवल्याचं सांगण्यात आलं होतं. या मेलमध्ये सदरचा बॉम्ब दिलेल्या वेळी फुटेल असा इशारा देण्यात आला होता. या बातमीमुळं सर्वांची झोप उडाली होती. पोलिसांनी बीडीएसच्या सहाय्याने संपूर्ण इमारतीची कसून तपासणी केली. तपासणीनंतर येथे कोणतीही बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली नाही. पोलिसांनी हा तपास आता थांबवला आहे. पोलिसांनी सायबर तज्ञांच्या माध्यमातून तपास केल्यानंतर या ईमेलचा आयपी पत्ता युरोपमधील असल्याचं समजलं. ठाणे पोलिसांनी ई-मेलच्या डोमेनला पत्र लिहून पिन पॉईंट लोकेशन आणि त्या आयपीची संपूर्ण माहिती मागवली आहे.

असा घडला होता प्रकार : ठाण्यातील सिनेगॉग चौकात असलेल्या ज्यू धर्मीयांच्या प्रार्थना स्थळी बॉम्ब ठेवल्याची धमकी आल्याने, प्रचंड खळबळ उडाली होती. हमास आणि पॅलेस्टाईन युद्धाच्या पार्श्वभूमीवर या धमकीला अत्यंत गांभिर्यानं घेत ठाणे पोलिसांनी (Thane Police) या परिसराला संपूर्णतः सील केलं होतं. प्रार्थना स्थळ प्रशासनाला ई-मेलद्वारे आलेल्या धमकीमुळं येथे प्रचंड तणावाचं वातावरण परिसरात पसरलं होतं. तर भारतात राहणाऱ्या ज्यूच्या एकूण लोकसंख्येच्या ४० टक्के लोकसंख्या ही ठाणे आणि आसपासच्या परिसरात राहते.


हेही वाचा -

  1. ज्यू धर्मीयांच्या प्रार्थना स्थळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलिसांची कसून शोधमोहीम
  2. Chabad House Security : मुंबईत पुन्हा 26/11 हल्ल्याचा संशय; छाबड हाऊसच्या सुरक्षेत वाढ
  3. मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी 11 बॉम्ब ठेवल्याबद्दल आरबीआय गव्हर्नरला धमकीचा ईमेल

ABOUT THE AUTHOR

...view details