महाराष्ट्र

maharashtra

शेजारधर्माला काळीमा, अल्पवयीन मुलीवर वृध्दाचा लैंगिक अत्याचार

By

Published : May 13, 2021, 8:02 PM IST

आपल्या शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत, तिच्यावर ५९ वर्षाच्या वृध्दाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना डोंबिवली येथे घडली.

शेजारी राहणाऱ्या वृद्द व्यक्तीकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
शेजारी राहणाऱ्या वृद्द व्यक्तीकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

ठाणे - शेजार धर्माला काळीमा फासणारी धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये समोर आली आहे. आपल्या शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर ५९ वर्षाच्या वृध्दाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या वृध्दाचे नाव अजित वज्रलाल (५९, रा. गोग्रासवाडी) असे आहे. या घटनेनंतर वृध्दावर गुन्हा दाखल करण्यात आला आसून, कल्याण येथील न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश आदेश दिले.

आरोपीला पाहून पीडिता भयभीत झाल्याने घटना समोर

पीडित मुलगी सद्या शाळा बंद असल्यामुळे डोंबिवलीतील आपल्या घरी दुपारी एकटीच असते. आई-वडील नोकरी करत असल्याने ते बाहेर जातात. मुलीची आई नेहमीप्रमाणे सकाळी ८ वाजता आपल्या कामावरून परत आली. त्यावेळी त्यांना आपली मुलगी घाबरलेल्या स्थितीत दिसली. त्यावर आईने तिची विचारपूस केल्यावर या मुलीने घडलेला प्रकार सांगितला. दुपारच्या सुमारास घराचा दरवाजा कुणीतरी ठोकल्याने मी घाबरून दरवाजा उघडला नाही असे त्या मुलीने आईला सांगितले. मुलगी हे सांगताना खूप घाबरलेली होती. त्यामुळे आईने विश्वासात घेऊन तिला सर्व माहिती विचारली. त्यानंतर अजित अंकलने सोमवारी दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान आपल्यावर घरातच जबरदस्ती केल्याची धक्कादायक माहिती या मुलीने दिली. मी विरोध केला असता अंकलने आपणास मारहाण केली. तसेच एक महिन्यापूर्वीही त्यांनी माझ्यासोबत अशीच बळजबरी केल्याचे या पीडित मुलीने आईला सांगितले.

मुलीला विवस्त्र करून केले मोबाईलमध्ये चित्रीकरण

या नराधमाने पीडितेला विवस्त्र करून मोबाईलमध्ये तिचे चित्रीकरणही केले. तसेच आई-वडिलांना जर सांगितले तर तुझा खून करीन अशी धमकीही या नराधमाने या मुलीला दिली. या घटनेनंतर पीडितेच्या आईने तात्काळ टिळकनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून नराधम अजित वज्रलाल याला बेड्या ठोकल्या. दरम्यान पोलिसांनी त्याला कल्याण न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा -अरबी समुद्रात चक्रीवादळ, मुंबईला धोका नाही

हेही वाचा -मुंबईत ‘एम्फो टेरेसीन बी’ इंजेक्शनचा तुटवडा, आरोग्य विभागासमोर 'म्युकरमायकोसिस' आव्हान

ABOUT THE AUTHOR

...view details