ठाणे -एकाच कुटुंबातील दोघांचा अहवाल हा कोरोना पाॅझिटिव्ह आला असूनही, ठाणे पालिकेच्या आरोग्य विभागाने दिरंगाई केल्याची घटना घडली. अखेर मनसेच्या पदाधिकार्यांनी ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला फोन करून या पाॅझिटिव्ह रुग्णांना दाखल करून घेण्याची विनंती केली. त्यामुळे सूत्र वेगाने फिरली. या रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी तब्बल ९ तासांनी अॅम्ब्युलन्स दाखल झाली.
ठाणे : ९ तासांनंतर कोरोना रुग्णांसाठी दाखल झाली अॅम्ब्युलन्स, मनसेच्या प्रयत्नाला यश - mns thane news
एकाच कुटुंबातील दोघांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला असूनही, ठाणे पालिकेच्या आरोग्य विभागाने दिरंगाई केल्याची घटना घडली. अखेर मनसेच्या पदाधिकार्यांनी ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला फोन करून या पाॅझिटिव्ह रुग्णांना दाखल करून घेण्याची विनवणी केली.
महात्मा फुलेनगर येथे एकाच कुटुंबातील दोघांचा कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचा अहवाल समोर आला. त्यांनी आरोग्य विभागाला संपर्क साधला. मात्र, त्यांनी दाद दिली नाही. अखेर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना उपशहराध्यक्ष संदीप चव्हाण यांनी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्याशी याबाबत संपर्क साधला. याप्रकरणी पाचंगे यांनी ठाणे पालिकेचे आरोग्य अधिकारी आर. टी. केंद्रे व माळगावकर यांना वारंवार संपर्क साधला. मात्र, त्यांनीही दाद न दिल्याने अखेर पाचंगे यांनी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख संतोष कदम यांना संपर्क साधला. त्यांनी या प्रकरणी त्वरित प्रतिसाद देत रात्री ११ वाजता अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली.
पालकमंत्र्यांच्या आदेशाला अधिकार्यांची केराची टोपली
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी दिरंगाईबद्दल पालिका अधिकार्यांना धारेवर धरले होते. मात्र, तरीही अधिकारी ताळ्यावर येत नाहीत. यातून ठाणेकरांच्या संतापाचा स्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.