महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंबरनाथमधील बारवर पोलिसांचा छापा; ६ बारबालासह २ ग्राहक अन् मॅनेजर ताब्यात

अंबरनाथ रेल्वे स्थानकासमोर समाधान बारमध्ये महिला वेटर्स बारमध्ये येणाऱ्या ग्राहकांसोबत अश्लील कृत्य आणि हावभाव करत असल्याची माहिती मिळाल्यामुळे अंबरनाथ पोलिसांनी या बारवर छापा टाकला.

प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Jul 12, 2019, 9:29 PM IST

ठाणे - अंबरनाथ रेल्वे स्थानकासमोरील समाधान बारवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी बारमधील काही बारबाला ग्राहकांशी अश्लील कृत्य करुन धांगडधिंगा करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी ६ बारबाला आणि २ ग्राहकांसह मॅनेजरला ताब्यात घेऊन त्यांच्यावर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. जगबीर (२९) गोविंद (२०) असे या २ ग्राहकांचे तर निलेश (२७) असे अटक केलेल्या बार मॅनेजरचे नाव आहे.

अंबरनाथ रेल्वे स्थानकासमोर समाधान बार असून या बारमध्ये कामावर ठेवण्यात आलेल्या महिला वेटर्स बारमध्ये येणाऱ्या ग्राहकांसोबत अश्लील कृत्य आणि हावभाव करत असल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील घुगे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी त्या बारमध्ये छापा टाकला. त्या ठिकाणी महिला वेटर्स ग्राहकांसोबत अश्लील कृत्य करत असल्याचे दिसून आले. या प्रकरणी महिला पोलीस नाईक नंदिनी पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अंबरनाथ पोलीस ठाण्यात ६ बारबाला आणि २ ग्राहकांसह बार मॅनेजर अशा ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details