ठाणे - पुराच्या पाण्यात वाहून जाताना अॅमेझॉनचा डिलिव्हरी बॉय झाडाच्या फांदीत अडकल्याने बचावल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील सोनाळे - बापगांव रोडवरील धुळखाडी पुलानजीक घडली आहे. रामदास सानप (वय ३५ रा. बापगांव, भिवंडी ) असे बचावलेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे.
पुराच्या पाण्यात वाहून जाताना अॅमेझॉनचा डिलिव्हरी बॉय झाडाच्या फांदीत अडकल्याने बचावला - अमेझॉन डिलिव्हरी बॉय
जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नदी - नाले तुडूंब भरून वाहत आहेत. त्यातच मंगळवारी भिवंडी तालुक्यातील सोनाळे - बापगांव रोडवरील धुळखाडी नाल्याला पूर आल्याने येथील छोट्या पुलावरून पाणी वाहत होते.
जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नदी - नाले तुडूंब भरून वाहत आहेत. त्यातच मंगळवारी भिवंडी तालुक्यातील सोनाळे - बापगांव रोडवरील धुळखाडी नाल्याला पूर आल्याने येथील छोट्या पुलावरून पाणी वाहत होते. त्यावेळी अॅमेझॉन कंपनीचा डिलिव्हरी बॉय आपली प्लॅटिनम दुचाकी जोरदार पाण्याच्या प्रवाहातून चालवत रस्ता पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुराच्या पाण्याचा वेग जास्त प्रमाणावर असल्याने डिलिव्हरी बॉय दुचाकीसह पाण्यात वाहून गेला. यावेळी सुदैवाने पुलाच्या खालच्या बाजूला नाल्यात उन्मळून पडलेले करंजाचे झाड असल्याने त्या झाडाच्या फांदीला अडकून डिलिव्हरी बॉय जीव वाचवण्यासाठी आरडाओरड करू लागला.
त्यावेळी धुळखाडी येथील स्थानिक तरुण विपूल चौधरी, सागर जोशी ,गोरख जोशी या तरुणांनी जीवाची बाजी लावून पाण्यात उड्या घेऊन डिलिव्हरी बॉय रामदासला पाण्यात बुडत असताना मोठ्या प्रयत्नांनी त्यास पाण्याबाहेर काढून त्याचा जीव वाचवला आहे. धुळखाडी येथील तरुणांनी आपल्या बहादुरीने पाण्यात बुडणाऱ्या डिलिव्हरी बॉयला वाचवल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.