ठाणे - कल्याण पूर्वतील दादासाहेब क्रीडांगणावर राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो लावण्यात आले आहे.
विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या राज्यस्तरीय कबड्डी सोहळ्याच्या कल्याणात समारोपासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या स्वागतार्ह लावण्यात आलेल्या बॅनरवर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अजित पवारांचे फोटो लावण्यात आल्याने जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.