मीरा भाईंदर (ठाणे)- मीरा रोड येथील राहणारी मुलगी ऋतुजा रावणने देश पातळीवर दिल्लीत आयोजित डियाडेम मिस इंडिया 2020 या स्पर्धेत उत्तेजनार्थ दुसरा क्रमांक पटविला आहे. यामुळे मीरा रोड येथील आपल्या घरी आल्यावर ऋतुजा रावण यांचे सत्कार करण्यात आले.
ऋतुजा रावण ही सध्या एका विमान सेवा कंपनीत हवाई सुंदरीची (एअर हॉस्टेस) नोकरी करते. पितृछत्र हरपल्यानंतरही आईच्या आधाराने प्रचंड मेहनत व आत्मविश्वासाच्या जोरावर तिने या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामुळे तिचा सर्वत्र कौतूक होत आहे.
दिल्लीत एनसीआरच्या गुरूग्राम येथील किंगडम ऑफ ड्रीम्समध्ये ब्युटी आयोजीत डियाडेम मिस इंडिया व मिसेस इंडिया लिगेसी 2020 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात देशपातळीवर अनेक राज्यातून 25 स्पर्धक सहभागी झाले होते. मीरा रोड येथील ऋतुजा रावणने उत्तेजनार्थ दुसरा क्रमांक पटकाविला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत व महाराष्ट्राचे नावलौकिक करणार
यावेळी, ऋतुजा रावण म्हणाली, मला कल्पनाही नव्हती की पहिल्या तीन क्रमांकावर येईन. पण, माझी कल्पना सत्यात उतरली आहे.राष्ट्रीय स्तरावर मला माझ्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करायला मिळाले याचा मला सार्थ अभिमान वाटतो. मला मिळालेल्या अनुभवावरुन आई व मित्रमंडळीच्या सहकार्याने यापुढे भारताचे पर्यायाने महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणार.
हेही वाचा -शहाडमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी
हेही वाचा -ठाणे : बेपत्ता भंगार विक्रेत्याची निर्घृण हत्या; एकाला अटक