महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : ठाण्यात भाजपा महिला मोर्चाच्यावतीने 'रस्ता रोको' - thane bjp mahila morcha agitation news

पूजा चव्हाणच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, राठोड यांनी राजीनामा दिला नाही. तर त्यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करावे. जोपर्यत राठोड यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवू, असेही यावेळी आंदोलनकर्त्यांनी म्हटले.

agitation-by-bjp-mahila-morcha-for-resignation-of-sanjay-rathod-in-thane
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : ठाण्यात भाजपा महिला मोर्चाच्यावतीने 'रस्ता रोको'

By

Published : Feb 27, 2021, 1:25 PM IST

ठाणे - पूजा चव्हाण या तरुणीच्या संशयास्पद मृत्यूची राज्य सरकारने चौकशी करावी, या मागणीसाठी ठाणे भाजपा महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत जोरदार निर्देशने केली. तसेच राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत रास्ता रोकोही करण्यात आला.

महिला मोर्चाचे आंदोलन

रस्ता रोकोमुळे प्रचंड वाहतूक कोंडी -

पूजाच्या मृत्यूला २० दिवस उलटून गेले, तरी पोलिसांनी या घटनेबाबत प्राथमिक माहिती अहवालही दाखल केला नाही. याचा अर्थ पोलिसांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे, असा आरोप यावेळी आंदोलकर्त्या महिलांनी केला. तर पूजा चव्हाणच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, राठोड यांनी राजीनामा दिला नाही. तर त्यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करावे. जोपर्यत राठोड यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवू, असेही यावेळी आंदोलनकर्त्यांनी म्हटले. दरम्यान, रस्ता रोको केल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा - सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीचे काय झाले? नाना पटोलेंचा भाजपला सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details