महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आरेमधील वृक्षतोडीचा निषेध; ठाण्यात युवकांचे आंदोलन - aarey metro car shed crisis agitation against aarey metro car shed tree cutting at thane

आंदोलनात तरुण, तरुणी, सामान्य नागरिक हातात फलक घेऊन या वृक्षतोडीचा विरोध करत आहेत. आमचा मेट्रो किंवा विकासकामांना विरोध नसुन आरेमधील वृक्षतोडीला विरोध आहे.

आरे मधील वृक्षतोड़ी विरोधात ठाण्यात युवकांचे आंदोलन

By

Published : Oct 6, 2019, 4:26 AM IST

ठाणे - 'आरे'मधील वृक्षतोडीसंदर्भात न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी त्याठिकाणी आंदोलन करत असतानाच पोलिसांनी जमावबंदीचे आदेश देऊन अनेक सामजिक संस्था, सामाजिक संघटना, विद्यार्थी, विद्यार्थिनींना अटक केलेली आहे. त्यामुळे आंदोलकांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर आता आरेतील वृक्षतोड विरोधात शांततेत आंदोलन सुरू केले आहे.

आरेमधील वृक्षतोड़ी विरोधात ठाण्यात युवकांचे आंदोलन

हेही वाचा -जितेंद्र आव्हाड छुप्या रस्त्याने 'आरे'त; पोलिसांनी घेतले ताब्यात

या आंदोलनात तरुण, तरुणी, सामान्य नागरिक हातात फलक घेऊन या वृक्षतोडीचा विरोध करत आहेत. आमचा मेट्रो किंवा विकासकामांना विरोध नसुन आरे मधील वृक्षतोडीला विरोध आहे. सरकारने दुसरा काही पर्यायी मार्ग काढावा. अशी या आंदोलकांची भूमिका आहे..तसेच या आंदोलनाला युवा सेनेने देखील पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा -सगळा अट्टहास 'आरे'मध्येच का? जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details