नवी मुंबई -गौरी, गणपती विसर्जनासाठी पनवेल महापालिकेकडून खास व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश घाटावर मूर्तींचे निर्जंतुकीकरण करून त्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात येत आहे. या व्यवस्थेची पाहणी पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी गणेश घाटाचा दौरा करत केली.
यावेळी आयुक्त देशमुख यांनी सांगितले की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी पनवेल महापालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे. यामध्ये गणेश मूर्तींचे निर्जंतुकीकरण करुन त्या मूर्तीचे विसर्जन पालिका कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने ही योजना आखली आहे.
अधिक माहिती देताना आयुक्त सुधाकर देशमुख... दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पनवेल महापालिकेकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. गौरी व गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात येणाऱ्या मूर्ती सर्वात आधी लोखंडी टाकीत निर्जंतुकीकरण करून पुन्हा नैसर्गिक आणि कृत्रिम तलावात त्याचे विसर्जन करण्यात येत आहे. यासाठी पालिकेने, पालिका हद्दीत विसर्जन घाटा जवळ लोखंडी टाक्या बसवल्या आहेत. या टाक्यांमध्ये निर्जंतुकीकरणासाठी सोडियम हाइपो क्लोराइड टाकण्यात आले आहे.
हेही वाचा -बीडीडी चाळींचा पुनर्विकास हवा, पण जाचक अटी रद्द करा- रहिवाशांची मागणी
हेही वाचा -कृषी क्षेत्रात संशोधनासाठी संस्था निर्माण करण्याची गरज - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे