ठाणे- मीरा भाईंदर महानगरपालिकामधील फेरीवाला पथक प्रमुख रवीद्र सानप मद्यपान करून व्यापारी वर्गाकडून पैसे उकळत असल्याचे समोर आले होते. २९ सप्टेंबरला 'ईटीव्ही भारत'ने ही बातमी प्रसिद्ध केली होती. अखेर मनपा आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी रवींद्र सानप याच्या निलंबनाचा आदेश काढला.
'ईटीव्ही भारत इम्पॅक्ट' : अखेर फेरीवाला पथक प्रमुख रविंद्र सानप निलंबित - ठाणे फेरीवाला
मनपा आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी फेरीवाला पथक प्रमुख रवींद्र सानप याच्या निलंबनाचा आदेश काढला. रवींद्र सानप २६ सप्टेंबरला रात्री ९ च्या सुमारास मीरा रोडमधील शांती पार्क सुरू असलेल्या दुकानांवर कारवाई करत होता.
सानप हा दारू पिऊन २६ सप्टेंबरला रात्री ९च्या सुमारास मीरा रोडमधील शांती पार्क येथे सुरू असलेल्या दुकानांवर कारवाई करत होता.व्यापारी वर्गाला धमकावून तो पैसे उकळत असल्याचे समोर आले. यानंतर व्यापारी वर्गाने याची माहिती तत्काळ काशिमीरा पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी रवींद्र सानपला पोलीस ठाण्आयात नेले आणि वैद्यकीय तपासणी करण्यात आली. याप्रकरणी 'ईटीव्ही भारत'ने ही बातमी प्रसिद्ध करताच प्रशासनाने ठोस पावले उचलत मुजोर कर्मचारी रवींद्र सानप याला निलंबित करण्याचा आदेश मनपा आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी जारी केला आहे.