ठाणे- कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी सायंकाळी ६ वाजता मतदान संपले. त्यानंतर सर्व मतपेट्या स्ट्राँग रूममध्ये आणल्या जातात. मात्र, कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील ३२३ मतपेट्या मतदान झाल्यानंतरही २४ तासांपर्यंत स्ट्राँग रूमपर्यंत पोहोचल्या नव्हत्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडून उलट-सुलट चर्चेला उधाण आले होते. मात्र, अखेरीस मतदान संपल्यानंतर तब्बल २४ तासानंतर ३२३ मतपेट्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षितपणे पोहोचल्या आहेत.
कल्याण लोकसभा : २४ तासानंतर ३२३ मतपेट्या पोहोचल्या स्ट्राँग रूममध्ये
कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी सायंकाळी ६ वाजता मतदान संपले. त्यानंतर सर्व मतपेट्या स्ट्राँग रूममध्ये आणल्या जातात. मात्र, कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील ३२३ मतपेट्या मतदान झाल्यानंतरही २४ तासांपर्यंत स्ट्राँग रूमपर्यंत पोहोचल्या नव्हत्या.
चौथ्या टप्प्यात कल्याण लोकसभा मतदारसंघात कमी मतदान झाले आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षाच्या उमेदवारांची धाकधुक वाढली आहे. अशातच मतदान संपल्यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघांतर्गत असलेल्या अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, डोंबिवली व कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतपेट्या या डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रूममध्ये आणणे अपेक्षित होते. त्यानुसार कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रातील मतपेट्यांचा अपवाद वगळता इतर सर्व विधानसभा क्षेत्रांतील मतपेट्या सकाळपर्यंत स्ट्राँग रूमपर्यंत पोहोचल्या होत्या. मात्र, दुपारपर्यंत कळवा-मुंब्रा परिसरातील ३२३ मतपेट्या स्ट्राँग रूमपर्यंत पोहोचल्या नाहीत. त्यामुळे कळवा-मुंब्रा संवेदनशील विभाग असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.
अखेरीस मतदान संपल्यानंतर तब्बल २४ तासांनी मतपेट्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षितपणे पोहोचल्या आहेत. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी कादबाने यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांनी रेकॉर्ड तपासायला उशीर झाल्यामुळे मतपेट्या पोहोचण्यास उशिर झाल्याचे सांगितले.