महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आदिवासी दिनानिमित्त ठाण्यात पारंपरिक वेशातील आदिवासी बांधवांची अनोखी रॅली - आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना ठाणे

जागतिक आदिवासी दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी शहरात मोटारसायकल रॅली निघते. आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना या रॅलीचे आयोजन करते.

जागतिक आदिवासी दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी शहरात मोटारसायकल रॅली निघते. आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना या रॅलीचे आयोजन करते.

By

Published : Aug 10, 2019, 9:39 PM IST

ठाणे- जागतिक आदिवासी दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी शहरात मोटारसायकल रॅली निघते. आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना या रॅलीचे आयोजन करते.

जागतिक आदिवासी दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी शहरात मोटारसायकल रॅली निघते. आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना या रॅलीचे आयोजन करते.

पोषमाता गावदेवी मंदीर-भाईंदर पाडा-नागरी बंदर तसेच जिल्ह्याधिकारी कार्यालय ते लोकमान्य नगर अशी भव्य मोटर सायकल रॅली निघते. रॅली दरम्यान ३ ठिकाणी तासभर विश्रांती घेतली जाते. या ठिकाणी आदिवासी बांधवांकडून पारंपरिक नृत्यासोबत विविध कला गुणांचे सादरीकरण केले जाते. आदिवासी समाजाच्या रुढी-परंपरा व चालीरिती याबाबत तरुणांना माहिती देण्यात येते.

ठाणे शहर हे चारही बाजूने जंगलाने वेढलेले आहे. या जंगलात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव राहतात. त्यांच्या पुढाकाराने ९ ऑगस्ट या आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details