ठाणे- घोडबंदर किल्ल्याचा विकास करून शिवसृष्टीच्या धर्तीवर प्रकल्प उभारण्यात येणार असून उपवन तलाव आणि उपवन घाट यांचा विकास करण्याची सकारात्मकता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दर्शवली आहे. संस्कृती आर्ट फेस्टिव्हल सोहळ्याचा सांगता सोहळा संपन्न झाला. या फेस्टिव्हलच्या शेवटच्या दिवशी आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली होती.
ठाण्यातील उपवन तलाव परिसरात संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आलं होतं. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या या फेस्टिव्हलला अनेक मान्यवरांसह दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. हे फेस्टिव्हलचे यंदाचे सहावे वर्ष आहे.