ठाणे- जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण सगळीकडे फिरत असताना वंचितांच्या समस्या समजून घेत आहे. सर्वांच्या गोष्टी कळून आल्या आहेत. सिंहाची, वाघाची डरकाळी माहित होते. पण, शेवटची मंद हाक माहित होत नाही. यासाठीच मला नवा महाराष्ट्र घडवायाचा आहे. हे एकट्या दुकट्याचे काम नाही आणि त्यासाठी मला आशीर्वाद द्या, अशी हाक युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी डोंबिवलीत दिली.
यासाठीच मला नवा महाराष्ट्र घडवायचा - आदित्य ठाकरे - जन आशीर्वाद news
शेवटची मंद हाक माहित होत नाही. यासाठीच मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - ..तर लोक आम्हाला वेडे समजतील - आदित्य ठाकरे
ते पुढे म्हणाले, जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून फिरत असताना मला प्रत्येकजण त्यांच्या मनातील गोष्टी सांगत आहेत. जो शेवटचा आवाज आहे. जो माझ्यापर्यंत पोहचत नाही. त्यांच्या अडचणी मला सोडवायच्या आहेत. मला आमदार, खासदार, मंत्री बनायचे नाही. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून साडेपाच हजार किलोमीटरचा प्रवास करून डोंबिवलीत दाखल झाले. त्यावेळी त्यांनी उपस्थित डोंबिवलीकरांची संवाद साधला. माझ्या आईचं गांव डोंबिवली. माझी मावशी, आजीही डोंबिवलीची पण मला प्रचारासाठी सभेत बोलावे लागेल अस कधीच वाटले नव्हते. लोकसभा निवडणुकीत सर्वांनी जो विश्वास टाकला त्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा काढून त्यांची मने जिंकायची आहेत. डोंबिवली शहर शाखेच्या माध्यमातून शहरप्रमुख राजेश मोरे यांनी चांदीची तलवार भेट दिली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर विनिता राणे आदी मान्यवर उपस्थित होते.