ठाणे- नारायण राणेंच्या भाजप पक्षप्रवेशाबद्दल आदित्य ठाकरे यांना विचारले असता, सध्या राज्यात आणि देशात महापूर, बेरोजगारी असे असंख्य प्रश्न आहेत, अशा वेळी आम्ही आमच्या बद्दल बोललो तर लोक आम्हाला वेडे समजतील, अशी प्रतिक्रिया युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. आदित्य हे आज (बुधवारी) जन आशीर्वाद यात्रेदरम्यान ठाणे जिल्ह्याच्या अंबरनाथ, उल्हासनगर, डोंबिवली, कल्याण शहराच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी अंबरनाथमध्ये त्याने ही प्रतिक्रिया दिली आहे.
..तर लोक आम्हाला वेडे समजतील - आदित्य ठाकरे - नारायण राणे news
नारायण राणेंच्या भाजप पक्षप्रवेशाबद्दल आदित्य ठाकरे यांना विचारले असता, आम्ही आमच्या राजकीय करिअर बद्दल बोललो तर लोक आम्हाला वेडे समजतील, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे
आरे वृक्षतोड प्रकरणात एमएमआरसीएचे अधिकारी मुख्यमंत्र्यांना खोटे बोलायला लावत असल्याची खंत वाटते, असा गंभीर आरोप युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. या आरोपावर मुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देतात की, अधिकाऱ्यांची बाजू घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा - देशात पहिल्यांदाच ठाण्यातील 'या' हॉटेलात रोबोट देतोय सेवा.. ४ ते ५ हजार लोकांना वाढतो जेवण