ठाणे - लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच भिवंडी शहरातील एका कचरा कुंडीत शेकडोआधारकार्ड आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे आधारकार्ड कचराकुंडीत आढळून आल्याने या निवडणुकीत बोगस मतदान होण्याची शक्यता नागरिकांनी कडून वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच निजमपुरा पोलिसांनी सर्व आधारकार्ड ताब्यात घेतले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कचरा कुंडीत आढळले शेकडो आधारकार्ड; बोगस मतदानाचा संशय - आधारकार्ड
शहरातील अजय नगर परिसरातील कचराकुंडीत सुमारे ३०० ते साडेतीनशे आधार कार्ड आढळून आले. या आधारकार्डमध्ये आपले आधारकार्ड तर नाही ना, हे बघण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. हे सर्व आधारकार्ड २०१५ मधील असून भिवंडी शहरातील खडक रोड, कोंबडपाडा, अजय नगर, गोकुळ नगर परिसरातील नागरिकांच्या नावाने असल्याचे समोर आले आहे.

स
रकारने आधारकार्ड नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पोस्टाला दिली आहे. मात्र, आधारकार्ड त्यांच्यापर्यंत न पोहोचवता ती कचराकुंडीत फेकून दिल्याने या आधारकार्डचा दुरूपयोग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणुक तोंडावर आहे. यामध्ये बोगस मतदान यादीत नाव नोंदवून बोगस मतदान करण्याचा कट होता का? असा संशय नागरिकांनी व्यक्त केला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आधारकार्ड ताब्यात घेतले आहेत.