ठाणे - आईने स्वतःच्या मुलीची हत्या करून स्वतःदेखील गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. कळवा बाजारपेठ परिसरात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रशांत पारकर हे व्यक्ती आपल्या कुटुंबीयांसोबत बाजारपेठ परिसरातीतल गौरीसमुन सोसायटीमध्ये दुसऱ्या माळ्यावर राहतात. ते नेहमीप्रमाणे आज सकाळी देखील जिममध्ये गेले होते. त्यावेळी त्यांची पत्नी प्रज्ञा पारकर आणि मुलगी श्रृती दोघीच घरी होत्या. शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास प्रज्ञाने मुलगी श्रृतीचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली.