ठाणे - ठाण्यातील महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि परिचारिकेच्या हलगर्जीपणमुळे एका नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांंनी आणि स्थानिक नगरसेवकांनी संबंधित डॉक्टर आणि परिचारिकावर कारवाईची मागणी केली आहे.
डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे नवजात अर्भकाचा मृत्यू; दोषींवर कारवाईची मागणी
ठाण्यात डॉक्टर आणि परिचारिकेच्या हलगर्जीपणामुळे एका नवजात अर्भकाचा मृत्यू झाला आहे. जर डॉक्टरांनी वेळत उपचार केले असले तर ही घटना घडली नसती. दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक संजय भोईर यांनी केली आहे.
ठाण्याच्या बाळकूम परिसरातील ठाणे महानगरपालीकेच्या आरोग्य केंद्रात कविता चव्हाण या महिलेला १९ तारखेला रात्री साडेबाराच्या दरम्यान प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. या आरोग्य केंद्रातमध्ये कविता बरोबर आणखी दोन महिला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होत्या. आरोग्य केंद्रातमधील डॉक्टरांनी कविता बरोबर ज्या महिला प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या, त्या दोन्ही महिलांची प्रसूती करण्यात आली. मात्र कविताला तसेच बेडवर झोपवून ठेवण्यात आले होते. या आरोग्य केंद्रातातील परिचारिका कविताकडे दुलक्ष करून झोपल्या होत्या. मात्र कविताला प्रसूती कळा असाह्य झाल्याने तिची बेडवरच प्रसूती झाली. व जन्म घेतलेलं बाळ बेडवरुन खाली पडून दगावल. जर परिचारिकानी व डॉक्टरांनी कवितांची वेळेत प्रसूती केली असती तर ही मुले दगावला नसते, असा आरोप कवितांच्या नातेवाईकांनी केली आहे. तसेच आरोग्य केंद्रातील दोघी डॉक्टर व परिचारिकावर कारवाईची मागणी स्थानिक नगरसेवक संजय भोईर यांनी केली आहे.