ठाणे: आज तालुक्यामध्ये वाळू माफियांचा सुळसुळाट चालू असल्याबाबतची बातमी प्रसिद्ध झालेली होती. ठाणे तालुक्यामार्फत सतत सात दिवसांनी कारवाई करण्यात येते. सतत खाडीमध्ये देखील बोटी मार्फत वाळूमाफियांना धडा शिकवला जातो. आज तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असून देखील, ठाणे तालुक्याचे नायब तहसीलदार व त्यांचे सहकारी तलाठी, युवा मंडळाधिकारी यांनी मुंब्रा खाडीमध्ये मोठी कारवाई केली आहे. एकूण 40 लाखाचा मुद्देमाल हा पाण्यात बुडवून टाकला आहे.
40 लाखाचा मुद्देमाल पाण्यात टाकला : वास्तविक सदरची जबाबदारी ही महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची आहे. सागरी किनारा पोलीस देखील याच्यामध्ये ठोस कारवाई करू शकतात, कारण महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड तसेच सागरी किनारा पोलीस यांच्याकडे पूर्ण यंत्रणा असते. परंतु महसूल विभागाकडे कुठल्या प्रकारच्या बोटीवर यंत्रसामुग्री नसतात, तरीदेखील ठाण्यामध्ये सतत अशा कारवाई महसूल विभागामार्फत केल्या जातात. आज 40 लाखाचा मुद्देमाल पकडून पाण्यात बुडवून टाकण्यात आला आहे.
महसूल विभागाची कारवाई : पुन्हा एकदा महसूल खात्याने दाखवून दिले आहे की, यंत्रसामुग्री नसताना देखील महसूल विभाग आपली कारवाई पार पाडते. आज देखील त्याचा प्रत्यय आलेला आहे. अतिशय धो धो पाऊस असताना देखील, महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी आज खाडीमध्ये कारवाई केली आहे. जी कारवाई महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड व सागरी किनारा पोलीस यांनी करणे अपेक्षित आहे ती कारवाई, महसूल खात्याने केली आहे. खाडीमध्ये 24 तास वेगळी यंत्रणा पुरवणे आवश्यक आहे. खाडीमध्ये बोटी देऊन त्याच्यामध्ये संपूर्णतः बोटी ह्या यंत्रसामुग्री सुसज्य असल्या पाहिजेत. तरच या वाळूमाफियांना आळा बसू शकेल. आता या कारवाईनंतर देखील शासनाला ठोस कारवाई करण्यासाठी वेगळी पावले उचलण्याची गरज आहे असे मत, जाणकार व्यक्त करत आहेत.
हेही वाचा -
- Action On Sand Mafia: तहसीलदार सुनील सावंत यांनी स्वीकारला पदभार; वाळू माफियांना बसणार लगाम
- वाळू माफियांची मुजोरी; जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर चालवला टिप्पर, घटनेत जिल्हाधिकाऱ्यांचा बॉडीगार्ड जखमी
- Action On Sand Mafia: वाळू माफियांवर कारवाई होणार, हायवाने कट मारल्यानंतर बीड जिल्हाधिकाऱ्यांची ठोस भूमिका