महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मांगूर माशांचे अनधिकृत तलाव नष्ट करण्याची कारवाई सुरू - ठाणे जिल्हा बातमी

शासनाची बंदी असूनही भिंवडी तालुक्यात वन विभागाच्या 150 एकर जमिनीवर मांगूर माशांचे 126 पेक्षा जास्त अनधिकृत तलावावर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

मांगूर मासे
मांगूर मासे

By

Published : Jan 7, 2021, 4:56 PM IST

Updated : Jan 7, 2021, 6:30 PM IST

ठाणे - शासनाची बंदी असूनही भिवंडी तालुक्यात वन विभागाच्या 150 एकर जमिनीवर मांगूर माशांचे 126 पेक्षा जास्त अनधिकृत तलावावर कारवाई करत तलाव नष्ट करण्याचे आदेश मत्स्य, वन, महसूल व पोलीस विभागाला देण्यात आले आहेत.

आदिवासींचे विविध प्रलंबीत प्रश्न शासकीय पातळीवर मार्गी लावण्यासाठी राज्य आढावा समितीचे अध्यक्ष तथा श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित (राज्यमंत्री दर्जा) यांच्या अध्यक्षतेखाली नोव्हेंबर, 2020 मध्ये भिवंडी पंचायत समितीच्या सभागृहात शासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष बैठकीत हे आदेश देण्यात आले होते.

मासे नष्ट करण्याच्या कारवाईला सुरुवात

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या आदेशाने उपविभागीय महसूल विभागाच्या दिघाशी विभागाचे मंडळ अधिकारी अरुण शेलार यांसोबत विविध विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती मांगूर मासे नष्ट करण्याच्या कारवाईला सुरुवात केली आहे. तर अनिधकृत तलावामध्ये माती भराव करून ते बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे. मात्र, यामुळे शहरी भागात मांगूर माशांच्या विक्रीवर होणाऱ्या परिणामामुळे इतर प्रजोत्पादन तलावात वाढविल्या जाणाऱ्या रऊ व कटला जातीचे मासे चढ्या भावात विकली जाणार असल्याचे सांगण्यात आहे.

कारवाई करताना पथक

पर्यावरणाला अत्यंत घातक असलेल्या मांगूर जातीच्या माशाचे सुरू होते उत्पादन

पर्यावरणाला अत्यंत घातक असलेल्या मांगूर जातीचे माशाची प्रजाती नष्ट करण्याचे आदेश केंद्र सरकारने 19 डिसेंबर, 1997 रोजी दिले आहेत. राज्य सरकारनेही आयुक्त, मत्स्यव्यवसाय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून राज्यातील उपायुक्त मत्स्यव्यवसायांना 16 जून, 2011 रोजी मांगूर माशांच्या प्रजाती नष्ट करण्याबाबतचे आदेश दिले आहेत. पण, या विरोधात 2018 मध्ये हरित लावादात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याचाही निकाल सरकारच्या बाजूने लागला आहे. मांगूर हा माणसाच्या जीवनाला तसेच पर्यावरणाला घातक असणारा मासा आहे. त्याची मत्स्यबीज केंद्रे आणि त्याचा तलावातील मत्स्यसाठा संपूर्णपणे नष्ट करण्याबाबतचा आदेश असतानाही भिवंडीमध्ये मुंबई-नाशिक महामार्गाच्या बाजूला नदी किनारी व वन विभागाच्या 150 एकर जमिनीवर 126 पेक्षा जास्त तलाव आढळले आहेत.

आदिवासीच्या जमिनीवर अनधिकृतपणे तलावात मांगूर माशांचे पालन

भिवंडी तालुक्यातील राहुर, कुंभारशिव, शिरगाव या परिसरात भूमिहीनांना तसेच वनपट्टे धारकांना दिलेल्या जमिनीवर आदिवासींच्या दारिद्र्य व अशिक्षितपणाचा फायदा घेऊन काही लोकांनी अनधिकृतपणे तलाव खोदून त्यात बंदी असलेल्या मांगूर माशांचे पालन होत असल्याचे निदर्शनास आले होते. या ठिकाणी वन विभागाच्या 150 एकर जमिनीवर 126 पेक्षा जास्त तलाव आढळून आल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.

हेही वाचा -खळ्ळखट्याक..! मनसैनिकांनी फोडली 'टोरंट पॉवर'ची कार्यालये

हेही वाचा -भाजपाला धक्के पे धक्का : सुपारीकांड नगरसेवकाचा जामीन नामंजूर

Last Updated : Jan 7, 2021, 6:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details