महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३५ हजार नागरिकांवर कारवाई

पनवेल महापालिका हद्दीमध्ये विनाकारण फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. पकडून आणलेल्या नागरिकांची अँटिजेन टेस्ट करण्यात येत असून परिमंडळ-2 मध्ये सुमारे 35 हजार नागरिकांवर निर्बंधाची पायमल्ली केल्याने कारवाई करण्यात आली आहे.

violating Corona rules in Panvel
violating Corona rules in Panvel

By

Published : May 18, 2021, 2:54 PM IST

Updated : May 18, 2021, 3:04 PM IST

नवी मुंबई - पनवेल महापालिका हद्दीमध्ये विनाकारण फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. पकडून आणलेल्या नागरिकांची अँटिजेन टेस्ट करण्यात येत असून परिमंडळ-2 मध्ये सुमारे 35 हजार नागरिकांवर निर्बंधाची पायमल्ली केल्याने कारवाई करण्यात आली आहे.

पाच हजार नागरिकांवर मास्क न लावल्याने कारवाई -

पनवेल महापालिका क्षेत्रात मास्क न लावणे या सारख्या गोष्टींमध्ये वाढ होत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासन यांच्या माध्यमातून 24 दिवसात आतापर्यंत पाच हजार नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.

पनवेलमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
आतापर्यंत ३५ हजार नागरिकांवर नियमांचे उल्लंघन प्रकरणी कारवाई -
पनवेल मनपा, पोलीस प्रशासन तसेच महसूल विभागाच्या माध्यमातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे ३५ हजार नागरिकांवर कारवाई केली गेली आहे. त्याचप्रमाणे सोशल डिस्टनसिंग न पाळणे, आस्थापनाचे नियम न पाळणे कारण नसताना ई-पासशिवाय विनाकारण फिरणे, अशा व्यक्तींवर कारवाई करण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र अजून कोरोनाची साखळी पूर्णपणे ब्रेक झाली नाही. अत्यावश्यक गोष्टींचा फायदा घेऊन काही लोक मुद्दाम एका भागातून दुसऱ्या भागात जातात याला पायबंद बसावा म्हणून पनवेल परिसरात कारवाई करण्यात येत आहे.
Last Updated : May 18, 2021, 3:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details