महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडीत एका गटाकडून दुसऱ्या गटावर ॲसिड हल्ला; पाच ते सहा जण गंभीर - ठाणे पोलीस

दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका गटातील तरुणांवर दुसऱ्या गटाने ॲसिड हल्ला केला. जखमींवर स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

acid attack in bhiwandi
भिवंडीत एका गटाकडून दुसऱ्या गटावर ॲसिड हल्ला; पाच ते सहा जण गंभीर

By

Published : Oct 10, 2020, 12:34 AM IST

Updated : Oct 10, 2020, 9:21 AM IST

ठाणे - ठाणे : भिवंडी शहरातील साई नगर ताडाळी अंजुरफाटा रोड येथे गुरुवारी झालेल्या क्षुल्लक वादातून मुलांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून शुक्रवारी रात्रीच्या सुमारास जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणांवर तीन ते चार जणांनी अॅसिड फेकले. या हल्ल्यात 6 जण जखमी झाले आहेत. तर तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

भिवंडीत एका गटाकडून दुसऱ्या गटावर ॲसिड हल्ला; पाच ते सहा जण गंभीर

भिवंडी शहरातील ताडाळी साईनगर येथील निखिल शर्मा हा गुरुवारी कामावरून घरी परतत असताना त्या परिसरातच राहणाऱ्या एका व्यक्तीचा धक्का लागल्याने मुलांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. त्यानंतर निखिल शर्मा व त्याचे मित्र अभिषेक देशमुख, अभिषेक शर्मा, रोहित पांडे व सुरज पटेल यांनी मारहाण केल्याप्रकरणी जाब विचारला. यासाठी ते संबंधित व्यक्तीच्या घरी गेले. यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे रुपांतरण हाणामारीत झाले.

एका गटाकडून बेसावध असणाऱ्या या मुलांवर समोरच्या तीन ते चार व्यक्तींनी अॅसिड फेकले. या अचानक झालेल्या हल्ल्याने हे 5 ते 6 युवक भाजले. त्यांनी घराकडे पळ काढला. या भांडणात एक महिला देखील जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या हल्ल्यातील सर्व जखमींना इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर अभिषेक देशमुख, निखिल शर्मा व अभिषेक शर्मा हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी ठाणे-कळवा रुग्णालय भरती केले आहे. या प्रकरणी स्थानिक नारपोली पोलिसांनी जखमी युवकांचे जबाब नोंदवून आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपींचा शोध सुरू आहे.

Last Updated : Oct 10, 2020, 9:21 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details