ठाणे कल्याण रेल्वे स्थानकाच्या पूर्वेस असलेल्या रेल्वेच्या तिकी घर परिसरात १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा लैगिंक छळ करून विनयभंग करणाऱ्या आरोपाला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राज तिवारी वय २१, राहणार चिखलोली अंबरनाथ असे बेड्या ठोकलेल्या आरोपीचे नाव आहे.
कल्याण रेल्वेच्या तिकीटघर परिसरात महाविद्यालयीन तरुणीचा लैगिक छळ करणाऱ्या आरोपीला बेड्या
पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी राज विरोधात भादंवि कलम ३५४, ३५४ड ३२३, ५०६ सह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. गुरुवार १८ ऑगस्टला आरोपीला कल्याणच्या रेल्वे न्यायालयात हजर केले असता १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. अधिक तपास कल्याण लोहमार्ग पोलीस करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आंधळे यांनी दिली.
पीडितेच्या वडिलांनी आरोपीला पाहिले लैगिंक छळ करतानासूत्राने दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी १७ वर्षाची असून ती कुटूंबासह कोळसेवाडी भागात राहते. ती एका महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत आहे. तर आरोपी राज हा अंबरनाथ शहरातील चिखलोली परिसरात राहणार आहे. तो गेल्या सहा महिन्यापासून पीडित तरूणीचा सतत पाठलाग करून तिला त्रास देत होता. त्यातच त्याने १७ ऑगस्टला दुपारच्या सुमारास पीडित तरुणी घरून कल्याण रेल्वे स्थानकाच्या दिशेने येत असताना आरोपीने तिचा पाठलाग सुरु केला. त्यावेळी कल्याण पूर्वेतील रेल्वे तिकीटघर परिसरात पीडितेला गाठून तिचा लैगिंक छळ करत मारहाण करून धमकी देत असतानाच पीडितेच्या वडिलांनी आरोपीला पहिले. त्यानंतर पीडितेला घेऊन कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून पीडितेवर घडलेला प्रसंग सांगताच पोलीस पथकाने रेल्वे तिकीट घर परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडीपीडितेच्या तक्रारीवरून आरोपी राज विरोधात भादंवि कलम ३५४, ३५४ड ३२३, ५०६ सह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. गुरुवार १८ ऑगस्टला आरोपीला कल्याणच्या रेल्वे न्यायालयात हजर केले असता १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. अधिक तपास कल्याण लोहमार्ग पोलीस करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आंधळे यांनी दिली आहे.