महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाणे : ठेकेदाराच्या हत्येच्या गुन्ह्यातील एका आरोपीला पोलिसांनी अमेठीतून केली अटक; विमानातून आणले महाराष्ट्रात - हत्येच्या गुन्ह्यातील एका आरोपीला अमेठीतून अटक

रंगारी ठेकेदाराचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे.

thane latest news
thane latest news

By

Published : Sep 12, 2021, 6:58 PM IST

Updated : Sep 14, 2021, 2:50 PM IST

ठाणे -ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ सप्टेंबर रोजी बेपत्ता झालेल्या हनुमंत पांडुरंग शेळके या रंगारी ठेकेदाराचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अन्य दोन फरार आरोपीचा शोध पोलीस पथक घेत आहे. शिव रामलाल वर्मा, सुरज श्रीराम वर्मा आणि अंकित कुमार सरोज, असे आरोपींची नावे आहे. दरम्यान, अटक केलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 19 सप्टेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. यापैकी एकाला पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या अमेठीतून अटक केली असून त्याला सुरक्षेच्या कारणास्तव विमानाने महाराष्ट्रात आणण्यात आले होते.

कुटुंबियांनी केली होती तक्रार -

आरोपी अंकित कुमार सरोज हा हनुमंत शेळके यांच्याकडे कामाला होता. हनुमंत शेळके हा १ सप्टेंबर रोजी रात्री घरी असताना आरोपीने सरोजच्या आईच्या औषधासाठी पैसे नाहीत. ते घेऊन बसस्टॉपवर ये असा कॉल त्याला केला होता. याची माहिती हनुमंत शेळकेने आपल्या पत्नीला दिली. तसेच पैसे देऊन येतो असे सांगून घराबाहेर पडला. मात्र, तो परत न आल्याने तो बेपत्ता तो असल्याची तक्रार शेळकेंच्या कुटुंबियांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात दिली होती.

हेही वाच-अशोक चव्हाण मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राहतील, तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणे अशक्य - प्रताप पाटील-चिखलीकर

Last Updated : Sep 14, 2021, 2:50 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details