ठाणे -एका ३० वर्षीय विवाहतेच्या घरात घुसून २८ वर्षीय आरोपीने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपीला पोलिसांनी केली अटक -

शहापूर तालुक्यातील एका गावात ३० वर्षीय पीडित विवाहिता पतीसह मुलांसोबत राहते. ती एका खाजगी कंपनीत कामाला असून त्याच कंपनीत आरोपीही काम करतो. त्यामुळे दोघांची ओळख झाली होती. याच ओळखीचा फायदा घेऊन तो पीडितेवर जवळकी साधत होता. विशेष म्हणजे पीडितेचा पती घरी नसताना तो घरी येणे-जाणे करत होता. हीच संधी साधून त्याने विवाहित पीडितेवर अत्याचार केला. त्यांनतर ब्लॅकमेल करून तो गेल्या जानेवारीपासून तिच्यावर राहत्या घरातच तिच्यावर वारंवार अत्याचार करीत होता. मात्र ह्या घटनेने पीडिता भयभीत होऊन अत्याचार सहन न झाल्याने अखेर तिने शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. घटनेची गांभीर्य ओळखून पोलिसांनी काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास शहापूर पोलीस करीत आहेत.
हेही वाचा -धक्कादायक! दारूसाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीला जिवंत जाळले