नवी मुंबई -रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, एक व्यक्ती बेशुद्ध पडल्याने, त्यांच्या पत्नीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. मृत्यूचे कारण माहिती नसल्याने आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पण, अखेर संबंधित व्यक्तीचा खून झाल्याचे तपासात पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अवघ्या 2 तासात अटक केले.
पोलिसांची तपासाची चक्रे फिरवत आकाश गायकवाड व त्याचे दोन साथीदार रोहीत झुंबार्डे, संतोष गायकवाड व शंकर गायकवाड यांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता, सचिन पाटील याने आकाश गायकवाड यास रस्त्यावर लघुशंका का केली म्हणून जाब विचारला होता. याचाच राग मनात धरून आकाशने रोहीत, संतोष व शंकरच्या मदतीने सचिन पाटील यास जमीनीच्या कोब्यावर आपटून बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. त्यानंतर त्यास उपचारासाठी घेऊन गेल्यास डॉक्टरांनी सचिनला मृत घोषित केले. या घटनेची साक्ष परमेश्वर बजरंग पवार याने दिली. त्याच्या जबाबावरुन रबाळे पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा करण्यात आला आहे.