महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडीत अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक चाळे करणाऱ्या विकृत नराधमाला बेड्या - bhiwandi crime news

भिवंडी शहरात एका हायप्रोफाईल इमारतीत पीडित चिमुरड्या राहतात. या इमारतीच्या आवारात चिमुरड्या मुली पाळीव श्वानांसोबत खेळत असतानाच विकृत कमलेश हा गुप्तांग बाहेर काढून त्या ठिकाणी आला. या विकृतीने या पीडितेशी लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भयभीत होवून त्या चिमुरड्यांनी घरात पळ काढला.

bhiwandi crime
आरोपी कमलेश जैन

By

Published : Feb 4, 2020, 9:21 PM IST

ठाणे- एका हायप्रोफाईल सोसायटीत राहणाऱ्या दोन चिमुरड्या मुलींसोबत लैंगिक चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा घृणास्पद प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी नजीमपुरा पोलीस ठाण्यात विकृत नराधमाविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. कमलेश जैन (वय, 36 ) असे नराधमाचे नाव आहे.

हेही वाचा -आमदार आशिष शेलारांच्या फोटोला शिवसैनिकांनी चपलेने बदडले

भिवंडी शहरात एका हायप्रोफाईल इमारतीत पीडित चिमुरड्या राहतात. या इमारतीच्या आवारात चिमुरड्या मुली पाळीव श्वानांसोबत खेळत असतानाच विकृत कमलेश हा गुप्तांग बाहेर काढून त्या ठिकाणी आला. या विकृतीने या पीडितेशी लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भयभीत होवून त्या चिमुरड्यांनी घरात पळ काढला.

दरम्यान, घडलेल्या प्रकाराने पीडित मुलींच्या मनामध्ये त्या विकृताबद्दल भीती पसरली होती. त्यातच पीडितेच्या आईने रात्रीच्या वेळी पीडितेला कपडे बदलण्यास सांगितले असता त्याने घाबरून अंकल येईल, असे सांगत कपडे बदलण्यास नकार दिला. त्याबाबत पालकांनी मुलींकडे अधिक चौकशी केली असता, हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडितेने सांगितलेल्या घटनेची खातरजमा करण्यासाठी पालकांनी इमारतीमधील सीसीटीव्ही तपासले असता, त्यामध्ये विकृतीचे किळसवाणे वर्तन दिसून आले. त्यानंतर पालकांनी निजामपुरा पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रसंग सांगत पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज दिले.

पोलिसांनी या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे विकृत कमलेश जैन याला त्याच्या घरातून ताब्यात घेत त्याविरोधात भादंवि कलम 354 सह पोस्को कायद्याअंतर्गत कलम 12 अन्वये गुन्हा दाखल करत अटक केली आहे. या नराधमाला भिवंडी न्यायालयात हजर केले असता, त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक बाजीराव भुसारे करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details