महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Accidental Death Of Woman Due potholes दुचाकी खड्ड्यात आदळल्याने टँकरखाली चिरडून महिलेचा अपघाती मृत्यू, कल्याणमधील घटना - कविता प्रशांत म्हात्रे

ठाणे जिल्ह्यात रस्त्यांवरील खड्डयांमुळे अपघात (Accidental death due potholes) होऊन नागरिकांचे जीव जाण्याचे सत्र सुरूच आहे. आज पुन्हा दुचाकी खड्ड्यात आदळल्याने टँकरखाली चिरडून महिलेचा अपघाती मृत्यू (Accidental Death Of Woman) झाल्याची घटना घडली. कल्याण पश्चिमेतील शहाड रेल्वे उड्डाणपूलावर हा अपघात झाला. कविता प्रशांत म्हात्रे, (kavita mhatre) वय ४० असे मृत महिलेचं नाव आहे. कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्यात अपघाताच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Kavita Prashant Mhatre
कविता प्रशांत म्हात्रे

By

Published : Sep 4, 2022, 8:14 PM IST

ठाणेठाणे जिल्ह्यात रस्त्यांवरील खड्डयांमुळे अपघात (Accidental death due potholes) होऊन नागरिकांचे जीव जाण्याचे सत्र सुरूच आहे. आज पुन्हा दुचाकी खड्ड्यात आदळल्याने टँकरखाली चिरडून महिलेचा अपघाती मृत्यू (Accidental Death Of Woman) झाल्याची घटना घडली. कल्याण पश्चिमेतील शहाड रेल्वे उड्डाणपूलावर हा अपघात झाला. कविता प्रशांत म्हात्रे, (kavita mhatre) वय ४० असे मृत महिलेचं नाव आहे. कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्यात अपघाताच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलीसपुढील तपास करत आहेत.

महिलेचा अपघाती मृत्यू

मृत कविता प्रशांत म्हात्रे कल्याण तालुक्यातील म्हारळ परिसरात राहत होती. कविता ही कल्याण पूर्व परिसरातील टाटा नाका परिसरातील एका पेट्रोप पंपावर कामाला होती. आज दुपारी ती म्हारळ येथील घरातून दुचाकीवरुन कामावर जाण्यासाठी निघाली. तिची दुचाकी शहाड पूलावर आदळली. ती खाली पडली. त्याच रस्त्याने तिच्या मागून येणाऱ्या टँकरच्या मागच्या चाकाखाली सापडून तिचा जागीच मृत्यू (Woman Crushed Under Tanker) झाला. या पूलावर बहुतांश ठिकाणी खडडे असून या खड्डय़ाच्या बाजूला माती साचली आहे. या खड्डय़ामुळेच हा अपघात झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे..

ABOUT THE AUTHOR

...view details